भाईंदर मधून बनावट नोटांसह 5 जणांना पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2018 20:16 IST2018-06-26T20:16:27+5:302018-06-26T20:16:44+5:30

2 हजार व 200 रुपयेच्या एक लाख 20 हजार 600 रुपये किमतीच्या बनावट नोटा नवघर पोलिसांनी जप्त केल्या आहेत. 5 जणांना अटक केली असून त्यांची गाडी जप्त केली आहे.

Five people caught fake notes from Bhaindar | भाईंदर मधून बनावट नोटांसह 5 जणांना पकडले

भाईंदर मधून बनावट नोटांसह 5 जणांना पकडले

मीरारोड - 2 हजार व 200 रुपयेच्या एक लाख 20 हजार 600 रुपये किमतीच्या बनावट नोटा नवघर पोलिसांनी जप्त केल्या आहेत. 5 जणांना अटक केली असून त्यांची गाडी जप्त केली आहे.
नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राम भालसिंग यांना माहिती मिळाली की, गोल्डन नेस्ट भागात एका गाडीतून बनावट नोटा नेल्या जाणार आहेत. पोलिसांनी त्या अनुषंगाने सापळा रचत नया नगर कडून आलेली चारचाकी गाडी अडवली. 

गाडीत फैजल इंद्रिस शेख, सय्यद रिजवान आयाज सय्यद, इमान अस्लम चारोली, सौद सलीम सय्यद ( सर्व रा. नया नगर, मीरारोड ) व मनीष मेखयानी या पाच जणांची झडती घेतली . त्यावेळी त्यांच्या कडे दोन हजार रुपयांच्या 50 तर दोनशे रुपयांच्या 103 बनावट नोटा आढळून आल्या. 
पोलिसांनी 1 लाख 20 हजार 600 रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त करून 5 ही आरोपींना अटक केली आहे. त्यांची गाडी देखील ताब्यात घेतली आहे. बनावट नोटा छापून त्या नोटांनी
महाबळेश्वर, गोवा आदी ठिकाणी मौजमजा करणार होतो अशी माहिती आरोपींनी दिल्याचे पोलीस म्हणाले.

Web Title: Five people caught fake notes from Bhaindar