मुले पळवणाऱ्या पाच जणांच्या टोळीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 03:39 AM2019-04-03T03:39:11+5:302019-04-03T03:39:13+5:30

८ ते १० मुलांचे अपहरण : परराज्यात विक्री केल्याचे चौकशीत उघड, बालकाची सुटका

Five people arrested for gang rape | मुले पळवणाऱ्या पाच जणांच्या टोळीला अटक

मुले पळवणाऱ्या पाच जणांच्या टोळीला अटक

googlenewsNext

मुंब्रा : मुले पळवणाऱ्या तीन महिलांसह पाच जणांच्या टोळीला शिळ-डायघर पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक केली. या टोळीच्या तावडीतून दोन वर्षांच्या अहमदची सुटका केली. या टोळीने आतापर्यंत ८ ते १० लहान मुलांचे अपहरण करुन त्यांची परराज्यात विक्री केल्याचे पोलिसांनी सांगितले.

मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारजवळील दहिसर गावातील ठाकुरपाडा परिसरात राहणाºया अहमद या दोन वर्षाच्या चिमुरड्याची आई घराजवळ असलेल्या नळावर पाणी भरण्यासाठी गेली होती. ती तेथून परतली, तेव्हा तिला तिचा चिमुरडा घरात आढळून आला नाही. त्याचा सर्वत्र शोध घेत असता त्याच परिसरात राहणारी आफ्रिन त्याला खाऊ देण्याच्या निमित्ताने घेऊन गेल्याचे त्याच्या पालकांना कळले. याबाबत आफ्रिनची आई मुबिनाकडे त्यांनी चौकशी केली असता, तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. याबाबतची तक्रार शिळ-डायघर पोलीस ठाण्यात दाखल होताच पोलिसांनी शीघ्र गतीने तपासाला सुरुवात केली. त्यांनी आफ्रिनच्या आईकडून तिचा मोबाईल नंबर घेतला. मायलेकींचे मोबाईल नंबर पोलिसांनी पाळतीवर ठेवले. त्यामधून त्यांना अहमद हा मुंब्रा येथील अमृतनगर भागातील निसम परिसरातील आलम महल या इमारतीमध्ये राहत असलेल्या आजीम दिवेकर आणि अमीना दिवेकर या दाम्पत्याच्या ताब्यात असल्याचे समजले. तेथे जाऊन मुंब्रा पोलिसांनी अहमदला ताब्यात घेऊन दिवेकर दाम्पत्य, आफ्रिन तसेच तिची आई मुबिना यांना अटक केली.
न्यायालयाने आरोपींना दि. १२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. यापूर्वी ८ ते १० मुलांचे अपहरण करु न त्यांची दिवेकर दाम्पत्याच्या मदतीने परराज्यात विक्री केल्याची कबुली आफ्रिनने दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

कार्यपद्धतीचा तपास
च्पोलिसांनी या प्रकरणात मोहम्मद अझरूद्दीन उर्फ हसरनुद्दीन उर्फ अब्दूल अजीज शमशाद खान यालाही अटक केली आहे.
च्पाचही आरोपींची कार्यपद्धती नेमकी कशी होती, याबाबत तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Five people arrested for gang rape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.