शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर अजित पवारांची माफी मागा; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला
2
Rishabh Pant Has Been Ruled Out : रिषभ पंतची न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेतून माघार; कारण...
3
'ठाकरे ब्रँड'चा फायदा उद्धव-राजना होणार? मराठी मतं 'गेम' फिरवणार? सर्व्हेची टक्केवारी समोर
4
WPL 2026 : हरमनप्रीतच्या MI चा विजयी कल्ला! DC ची कॅप्टन जेमिमावर आली स्मृतीसारखी वेळ
5
"उत्तर भारतीयांकडे वाकड्या नजरेने कुणी पाहिले तर..."; भाजपा मंत्री नितेश राणे काय बोलून गेले?
6
शिंदेसेनेला मतदान करा, जैन व्यापाऱ्याच्या मुलाची पोस्ट; भाजपा उमेदवाराच्या पत्नीने दिली धमकी
7
'गणेश नाईक यांची मनस्थिती बिघडली, त्यांना मानसोपचारतज्ज्ञाकडे घेऊन जा', शिंदेसेनेची बोचरी टीका
8
बांगलादेशला लागणार जॅकपॉट! ५०० टक्के टॅरिफच्या टांगत्या तलवारीनं का वाढली भारताची डोकेदुखी?
9
राम मंदिराजवळ नमाज पढणारा अब्दुल अहद शेख कोण? बॅगेत सापडलं असं काही, कुटुंबीय म्हणाले...  
10
PCMC Election 2026: निवडणुका जवळ आल्या की, अनेकांचा कंठ फुटून काहीही बोलतात, दादा आपण रागवायचं नाही - देवेंद्र फडणवीस
11
सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मुंबईहून पालघरला आले, पोहायला पाण्यात उतरले आणि एकावर मृत्युने घातली झडप
12
ठाकरे बंधूंच्या 'शिवगर्जनेची' तारीख ठरली! शिवाजी पार्कवर राज ठाकरे कोणता गौप्यस्फोट करणार?
13
शरद पवार अन् अजित पवार एकत्र येणार नाहीत?; प्रफुल पटेल यांच्या विधानानं नव्या चर्चांना उधाण
14
WPL 2026 : अनुष्का शर्माचा ‘पायगुण’! GG ची ‘साडेसाती’ संपली; UP वॉरियर्सकडून ‘ती’ एकटीच लढली
15
मोदी सरकारविरोधात लिखाण करणाऱ्या डॉ. संग्राम पाटील यांना मुंबईत येताच पोलिसांनी घेतलं ताब्यात
16
Holiday for Election: मतदानासाठी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर, कोणाला लागू असणार?
17
"आमचा जीव घेतला तरीही..."; सुप्रिया सुळे कडाडल्या; भाजपाला इशारा, मुंबईबाबत काय म्हणाल्या?
18
चौफेर टीका, भाजपाची नाचक्की, अखेरीस स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे याने दिला राजीनामा
19
Video - ओडिशामध्ये ९ सीटर चार्टर्ड प्लेन क्रॅश; पायलटसह ६ जण गंभीर जखमी
20
ICC U19 World Cup Warm up Matches : वैभव सूर्यवंशीची वादळी खेळी! शतक अवघ्या ४ धावांनी हुकलं
Daily Top 2Weekly Top 5

कर्जाने घेतलेली वाहने अल्प किंमतीत देण्याच्या अमिषाने पाच लाखांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 18:02 IST

दोघांना अटक: वागळे इस्टेट पोलिसांची कारवाई, सात वाहने जप्त

 बँकेतूल कर्जाने घेतलेली वाहने अल्प किंमतीत देण्याच्या अमिषाने संदीप गलांडे (४२) यांच्यासह नऊ जणांची पाच लाख ४० हजारांची फसवणूक करणाºया ज्ञानेश्वर कोळी (४०) आणि दिनेश पाटील (४३) या दोघांना वागळे इस्टेट पोलिसांनी अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांनी मंगळवारी दिली. त्यांना १९ नोव्हेंबरपर्यत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

ठाण्यातील वागळे इस्टेट लुईसवाडी भागातील रहिवाशी गलांडे यांना कोळी आणि पाटील यांनी नविन स्कूटर दाखवून आरटीओच्या ट्रान्सफरची कार्यवाही पूर्ण करून एक महिन्याच्या आत देण्याचा दावा करीत गलांडे यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांना वेळोवेळी त्यांच्या व्हॉटसअप क्रमांकावर वेगवेगळया मोटारसायकलींचे फोटो पाठवून त्यांच्याकडून आॅनलाईन आणि रोख स्वरुपात एका स्कूटरसाठी ६० हजार रुपये अशा नऊ दुचाकींचे पाच लाख ४० हजारांची फसवणूक केली. प्रत्यक्षात त्यांना कोणतीही दुचाकी दिली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गलांडे यांनी याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम ४२०, ४०६, ३४ नुसार ज्ञानेश्वर आणि दिनेश या दोघांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला होता.

या गुन्हयाचे गांभीर्य पाहून वागळे इस्टेट परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गवारे आणि निरीक्षक शिवानंद देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरक्षक ज्योतीराम भोसले यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आधी १५ नोव्हेंबर रोजी शिंदखेडा (जि. धुळे) येथून मुख्य सूत्रधार ज्ञानेश्वर याला अटक केली. त्यापाठोपाठ दिनेशला बदलापूरमधून १६ नोव्हेंबर रोजी ताब्यात घेतले.

दुचाकीच्या मालकांनाही गंडासखोल चौकशीमध्ये याच आरोपींनी मोटारसायकलींच्या मुळ मालकांनाही पैशांची गरज असल्याचे ओळखून त्यांना बँकेचे कर्ज मंजूर करुन देतो असे सांगितले. त्यांना थोडे पैसे देत त्यांच्या नावावरील दुचाकीही स्वत:कडे ठेवल्या. त्याच दुचाकींच्या आधारे गलांडे यांच्यासह अन्य नागरिकांची फसवणूक केल्याची बाब उघड झाली. फसवणूकीतील नऊ स्कूटरपैकी चार लाख २० हजारांच्या सात दुचाकी आरोपींकडून हस्तगत केल्या आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Loaned vehicle scam: Five lakhs fraud under low price allure.

Web Summary : Two arrested for duping nine people of ₹5.4 lakhs with the promise of cheap, bank-loaned vehicles. The fraudsters took money for scooters but never delivered them, also deceiving original owners with loan promises.
टॅग्स :thaneठाणेThiefचोरPoliceपोलिस