शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
3
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
5
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
6
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
7
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
8
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
9
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
10
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
11
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
12
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
13
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
14
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
15
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
16
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
17
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
18
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
19
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
20
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'

राज्यस्तरीय आंबडेकरी साहित्य संमेलनात मांडले गेले पाच महत्वाचे ठराव

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2017 8:14 PM

मुंबईतील इंदू मिलच्या नियोजित जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभे केले जाणार आहे. निवडणूका आल्या की, मते मिळविण्यासाठी केवळ दोन विटा रचल्या जातात. पुढे त्याचे काम ठप्प आहे. त्यामुळे आंबेडकर स्मारकाचे काम त्वरीत पूर्ण करावे असा ठराव आज पार पडलेल्या राज्यस्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य संमेलनात मंजूर करण्यात आला आहे. 

कल्याण : मुंबईतील इंदू मिलच्या नियोजित जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभे केले जाणार आहे. निवडणुका आल्या की, मते मिळविण्यासाठी केवळ दोन विटा रचल्या जातात. पुढे त्याचे काम ठप्प आहे. त्यामुळे आंबेडकर स्मारकाचे काम त्वरीत पूर्ण करावे असा ठराव आज पार पडलेल्या राज्यस्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य संमेलनात मंजूर करण्यात आला आहे.     अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे ठाणे जिल्हा शाखा आणि नालंदा बुध्द विहार यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय डॉ. बाबासाहेब आंबडेकर साहित्य संमेलन मोहोने येथे आयोजित करण्यात आले होते. एक दिवसीय साहित्य संमेलनानिमित्त सकाळीच भव्य संमेलन यात्रा काढण्यात आली. त्यानंतर संमेलन उद्घाटनाचा कार्यक्रम केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले व ज्येष्ठ विचारवंत डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्यास मंत्री महादेव जानकर यांच्या उपस्थित पार पडला. संमेलनाच्या दुपारच्या सत्रत आंबेडकरी कवींचे काव्यवाचन कवीमंच नामदेव ढसाळ मंचावर पार पडले. समारोपास येणा-या मान्यवरांनी संमेलनाच्या समारोपाकडे पाठ फिरवल्याने आहे. त्या मान्यवरांच्या उपस्थित समारोपाचा कार्यक्रम उरकून घेण्यात आला. जयप्रकाश घुमटकर यांनी या संमेलनात महत्वपूर्ण पाच ठराव मांडले त्याला मंजूरी दिली. हे पाच ठराव मुख्यमंत्र्यांकडेही पाठविले जाणार आहे. त्याचा पाठपुरावा केला जाणार आहे. त्यापैकी इंदू मिलच्या नियोजीत जागेत आंबडेकरांचे भव्य स्मारक उभारण्यात दिरंगाई होत आहे. हे स्मारक तातडीने लवकरात लवकर उभारले जावे, असा पहिला ठराव मांडण्यात आला. ज्या मोहने नगरीत हे संमेलन आयोजित केले गेले.  ज्या मोहने नगरीत हे संमेलन आयोजित केले गेले. त्या मोहनेतील एनआरसी कंपनी 2009 सालापासून बंद आहे. मालकाने कामगारांना थकीत देणी दिलेली नाही. कामगार देशोधडीस लागले आहेत. तीन हजार कामगारांना थकीन देणी मिळालेली नाही. कंपनी सुरु झाली नाही झाली तरी कामगारांना त्यांची थकीत देणी देण्यात यावी असा दुसरा ठराव करण्यात आला. राज्य सरकारने शेतक-यांना कजर्माफी व्याजासकट द्यावी. तसेच त्यांचे सातबारे कोरे करावे असा ठराव मांडण्यात आला. हा तिसरा ठराव होता. पालघर तालुक्यात ऑनलाईनवर 150 रुपये भरुन अर्ज भरून घेतला गेला. त्या शेतक-याला 15 रुपये कजर्माफी देण्यात आली. त्याचा अर्जाचा खर्च जास्त होता. या मुद्याकडे घुमटकर यांनी लक्ष वेधले. मुंबई विद्यापीठाचा खेळखंडोबा झाला आहे. त्यात राज्य सरकारने लक्ष घालून लाखो विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा. त्यांचे भवितव्य वाया जाता कामा नये. हा चौथा ठराव होता. पाचव्या ठरावानुसार मोहने येथे रुग्णालयासाठी जागा देण्यात आली आहे. सामान्यांसाठी रुग्णालय उभारण्यात यावे. हा ठराव मांडला गेला. संमेलनाच्या विचारपीठावरुन मांडलेल्या ठरावापैकी आंबडेकर स्मारकाचा ठराव हा देशपातळीशी संबंधित होता. तर शेतकरी कर्ज माफीचा मुद्दा हा राज्य पातळीवरील होता. विद्यापीठाचा मुद्दा हा मुंबई व कोकण प्रातांपूरता होता. अन्य दोन विषय हे कामगार व आरोग्यांच्या प्रश्नाची निगडीत होते. त्यामुळे मांडलेले सगळे ठराव हे जनहिताचे आणि तळागाळीतील सामान्यांच्या प्रश्नाशी निगडीत होते. संमेलनाच्या व्यासपीठावर केवळ ठराव मांडून ते मंजूर केलेले नसून विचाराची बांधिलकी जपणार असल्याने त्याचा पाठपुरावाही सातत्याने केला जाईल असे घुमटकर यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :thaneठाणे