शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

पहिल्या दिवशी ५० रुग्णालयांची झाली पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 12:07 AM

अग्निशमन दलाकडून झाडाझडती सुरू : ३० दिवसांची मुदत; पालिका आयुक्तांचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : भंडारा येथे झालेल्या आग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व रुग्णालयांची अग्निसुरक्षा यंत्रणा तपासण्याचे आदेश ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिले होते. त्यानुसार बुधवारपासून अग्निशमन दलाने ही तपासणी सुरू केली. त्यानुसार पहिल्या दिवशी याअंतर्गत ५० रुग्णालयांची तपासणी करून त्यांना येत्या ३० दिवसांत सक्षम आरोग्य यंत्रणा उभारण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या,

ठाणे महानगरपालिका हद्दीत आजघडीला एकूण ३४७ खासगी तर महापालिकेची २६ आरोग्य केंद्रे, कळवा येथील महापालिकेच्या मालकीचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, जिल्हा शासकीय रुग्णालय अशी एकूण ३७६ रुग्णालये आहेत. अग्निशामक दलाचे पथक प्रत्येक रुग्णालयात जाऊन तेथील सुरक्षायंत्रणेची तपासणी करणार आहेत. पहिल्या दिवशी या पथकांनी शहरातील ५० रुग्णालयांची तपासणी केली. यापूर्वी एप्रिल २०१८ मध्ये सपन श्रीवास्तव यांनी ठाणे पालिका हद्दीत अनेक रुग्णालयांमध्ये अग्निसुरक्षेचे नियम पाळले जात नसल्याचा आरोप करून मुंबई उच्च न्यायालयात याचिका सादर केली होती. यावर त्यावेळी न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभूदेसाई यांच्या खंडपीठाने ठाण्यातील रुग्णालयांमध्ये अग्निसुरक्षेची पाहणी करून सर्वेक्षणाचे आदेश दिले होते. परंतु नुकत्याच भंडारा येथे रुग्णालयात झालेल्या आगीच्या घटनेनंतर ठाणे अग्निशामक दलाने पुन्हा आपल्या हद्दीतील रुग्णालयांची अग्निसुरक्षा यंत्रणा तपासणी करण्यास सुरुवात केली आहे.

अनेक रुग्णालये दाटीवाटीच्या वस्तीतमहापालिका हद्दीत अनेक रुग्णालये दाटीवाटीने उभ्या असलेल्या इमारतीत आहेत. जिथे अनेक ठिकाणी नियमांकडे दुर्लक्ष करून कारभार चालवला जातो. आता या तपासणी मोहिमेनंतर सर्वच रुग्णालय प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. त्यानुसार या रुग्णालयांना तपासणीनंतर अग्निशमन दलाने केलेल्या सूचनेनुसार ३० दिवसांत त्यांच्या येथील अग्निसुरक्षा यंत्रणा सक्षम करावी लागणार आहे. तशा प्रकारची दुरुस्ती न केल्यास संबंधित रुग्णालयांवर कारवाई करण्यात येईल.

रुग्णालयांनी अग्निशमन यंत्रणा करावी सक्षमयाबाबत अग्निशमन दलाचे प्रमुख गिरीश झळके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आयुक्तांच्या आदेशानुसार आम्ही रुग्णालयांची अग्निसुरक्षा यंत्रणा तपासणीस बुधवारपासून सुरुवात केली. बुधवारी पहिल्या दिवशी ५० रुग्णालयांची तपासणी केली असून गुरुवारीही मोहीम सुरू होती. आम्ही प्रत्येक रुग्णालयाला त्यांची यंत्रणा सक्षम करण्यास ३० दिवसांची मुदत दिली असल्याचे त्यांनी सांगितले. 

 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिका