शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
2
"काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
3
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
4
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
5
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
6
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
7
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
8
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
9
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
10
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
11
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
12
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
13
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
14
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
15
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
16
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
17
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
18
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

समर्थ आर्केडमधील पाचव्या मजल्यावरील विकासकाच्या कार्यालयाला आग, इमारत केली सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 4:14 PM

उथळसर भागातील समर्थ आर्केडच्या पाचव्या मजल्यावरील विकासकाच्या कार्यालयाला आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नसली तरी देखील बचावकार्य करतांना अग्निशमन दलाचा एक जवान जखमी झाला आहे.

ठळक मुद्देरुग्णालयातील सात रुग्णांना सुखरुप बचावलेइमारत केली गेली सील

ठाणे - उथळसर भागातील समर्थ आर्केड या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील विकासकाच्या कार्यालयाला मंगळवारी सकाळी आग लागल्याची घटना घडली. याच इमारतीमध्ये एक हॉस्पिटल असून सुदैवाने जीवित हानी झाली नाही. इमारतीमधून सात रु ग्णांना सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. परंतु बचाव कार्य करताना अग्निशमन विभागाचा एक जवान जखमी झाला. आग विझवण्यासाठी ठाणे अग्निशामक दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या टीम सोबत दोन फायर इंजिन, दोन बचाव पथके, एक पाण्याच्या टँकर सह घटनास्थळी दाखल झालेल्या जवानांना दीड तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. ही इमारत सील करण्याचे आदेश मुख्य अग्निशमन अधिकारी शशिकांत काळे यांनी दिले आहेत, त्यानुसार ही इमारत सील करण्यात आली आहे.             उथळसर रोडवरील हॉलीक्र ॉस शाळेच्या समोरच समर्थ आर्केड ही पाच माजली इमारत आहे. याच इमारतीमधील पाचव्या मजल्यावर संजय भालेराव या विकासकाचे कार्यालयात आहे. सकाळी साडेनऊच्या सुमारास भालेराव यांच्या कार्यालयाला अचानक आग लागली. ही इमारत पूर्णपणे वाणिज्य वापरातील असून यामध्ये कोणीही रहिवासी राहत नाही. याच इमारतीच्या पहिल्या मजल्यावर प्रथमेश हॉस्पिटल देखील आहे. आग लागल्यानंतर अवघ्या काही मिनिटामध्येच आपत्ती वव्यस्थापन विभागाची टीम आणि अग्निशमन विभागाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. आगमीमध्ये विकासक भालेराव यांच्या कार्यालयाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर प्रथमेश हॉस्पिटलमधील दोन दिवसाच्या बाळाला सुखरूपपणे काढण्यात जवानांना यश आले. या दोन दिवसाच्या बाळाबरोबरच दोन रुग्णांचे नातेवाईक आणि हॉस्पिटलमधील दोन कर्मचाºयांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.         इमारतीच्या पाचच्या मजल्यावर जेव्हा आग लागली तेव्हा कार्यालय बंद होते. केवळ मोठ्या खिडकीमधून धूर निघत होता. त्यामुळे इमारतीमध्ये आग लागली असल्याचा अंदाज बांधून अग्निशमन विभागाला या संदर्भात माहिती देण्यात आली अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. अग्निशमन विभागाचे जवान चंद्रकांत डवले हे मात्र आग विझवताना किरकोळ जखमी झाले आहेत. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र ही संपूर्ण इमारत सील करण्यात आली आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाfireआग