आधारवाडीची आग अजून आठवडाभर, धुराचा त्रासही चार दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 03:33 AM2018-03-13T03:33:01+5:302018-03-13T03:33:01+5:30

आधारवाडी डम्पिंगला ग्राऊंडला शनिवारपासून आग लागण्याच्या घटना घडत आहेत. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाने विशेष टीम तयार केली आहे.

Fasting for fortnight, yet for four weeks | आधारवाडीची आग अजून आठवडाभर, धुराचा त्रासही चार दिवस

आधारवाडीची आग अजून आठवडाभर, धुराचा त्रासही चार दिवस

Next

कल्याण : आधारवाडी डम्पिंगला ग्राऊंडला शनिवारपासून आग लागण्याच्या घटना घडत आहेत. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाने विशेष टीम तयार केली आहे. आग विझवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. या आगीचे स्वरुप इतर आगीपेक्षा वेगळे असल्याने ती आटोक्यात आणण्यासाठी किमान आठ दिवसाचा अवधी लागेल. तसेच नागरिकांना चार दिवस धुराचा त्रास सहन करावा लागेल, अशी माहिती आयुक्त पी. वेलरासू यांनी सोमवारी दिली.
डम्पिंगच्या आगीवरुन कल्याण-डोंबिवलीत राजकीय रण पेटले असून आयुक्तांना हटविण्याची मागणी सुरू झाली आहे. राजकीय पक्षाच्या शिष्टमंडळाना न भेटता आयुक्तांन दिवसभर डम्पिंगची आग विझवण्याच्या कामात व्यस्त होते. त्यानंतर यासंकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन कामाचा तपशील दिला. यापूर्वी २००९ आणि २०१६ ला डम्पिंगला आग लागल्याचा संदर्भही देण्यात आला.
आयुक्त वेलरासू यांनी सांगितले, डम्पिंगच्या आगीचा पहिला कॉल शनिवारी आला. आग विझवण्यासाठी भिवंडी, नवी मुंबई महापालिकेतून अग्निशमन दलाच्या गाड्या पाचारण करण्यात आल्या. तसेच काही पाण्याचे टँकर मागविले गेले. पण डम्पिंग ग्राऊंडचा परिसर मोठा आहे. नगरपरिषद असल्यापासून तेथे कचरा टाकला जात आहे. आजमितीस त्याठिकाणी २५ मीटर कचºयाचा डोंगर आहे. १५ एकर जागेत हे डम्पिंग ग्राऊंड असल्याने आगीवर इतक्या लवकर नियंत्रण मिळविता येणार नाही. किमान आठ दिवस त्यासाठी काम करावे लागेल. सध्या खाडीत पाईप टाकून पाणी घेतले जात आहे. तसेच आधारवाडी सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून पाणी घेऊन आग विझविली जात आहे. डम्पिंगची आग विझविण्यासाठी रस्ता तयार केला आहे. नदी, खाडी आणि साठेनगर या तिन्ही बाजूने आग विझविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्या कामासाठी तीन उपायुक्त आणि तीन कार्यकारी अभियंत्याची टीम कार्यरत आहे. तसेच अग्निशमन दलाच्या गाड्या पाण्याचा मारा करुन आग विझविण्याचे काम करीत आहेत.
>प्रशासन आगीविषयी गंभीर
काही लोकांची रविवारी भेट घेतली तेव्हा दम्याचा त्रास असलेले दोन जण भेटले. त्यांना धुराचा त्रास अधिक झाला. त्यांना धुरापासून दूर हलविण्याचा सल्ला दिला. त्याचा विपर्यास करुन काहींनी आयुक्तांनी स्थलांतर करायला सांगितले असे पसरविले. वास्तविक पाहता त्यात काहीच वाईट उद्देश नव्हता. कोणी कोणाचे बोलणे कसे घेईल, हे सांगणे कठीण आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम प्रशासनाकडून केले जात आहे. त्यामुळे प्रशासन गंभीर नाही, असे म्हणणे चुकीचे ठरेल. आगीच्या धुराचा आणि डम्पिंगचा प्रचंड त्रास नागरिकांना होतो, हे मला मान्य आहे. नागरिकांनी आत्तापर्यंत जसे प्रशासनाला सहकार्य केले. त्याप्रमाणे आणखी आठ दिवस सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्तांनी केले.
>आग मिथेन वायूमुळे?
डम्पिंगला आग का लागली, याचे खरे कारण अद्याप समोर आलेले नाही. अग्निशमन दलाच्या अधिकाºयांच्या मते, कचरा प्रचंड असल्याने त्यातून उन्हाळ््यात मोठ्या प्रमाणात मिथेन वायू तयार होतो.
तो ज्वलनशील असल्याने सूर्यकिरणाच्या संपर्कात आल्यावर पेट घेतो. त्यामुळे आग लागते. असे असले, तरी आगाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पाण्याचा मारा करुन आग विझविली जात असली, तरी ती अत्यंत खोलवर असल्याने पाण्याचा मारा थांबताच पुन्हा उग्र स्वरुप धारण करते. त्याचबरोबर वाहत्या वाºयामुळे आगीचे स्वरुप भीषण होेते. म्हणून पाण्याचा मारा सतत सुरु ठेवण्यात आल्याचे आयुक्त वेलरासू यांनी सांगितले.

Web Title: Fasting for fortnight, yet for four weeks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.