डोंबिवली एमआयडीसीत झेनिथ रबर कंपनीला आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2018 08:03 IST2018-10-09T01:51:51+5:302018-10-09T08:03:22+5:30
येथील एमआयडीसी परिसरातील झेनिथ रबर कंपनीला सोमवारी मध्यरात्री आग लागल्याची घटना घडली.

डोंबिवली एमआयडीसीत झेनिथ रबर कंपनीला आग
डोंबिवली : येथील एमआयडीसी परिसरातील झेनिथ रबर कंपनीला सोमवारी मध्यरात्री आग लागल्याची घटना घडली. दरम्यान, घटनास्थळी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेतली असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. याबाबतची माहिती अग्निशमन विभाग अधिकारी दिलीप गुंड यांनी दिली.
आगीची माहिती समजताच घटनास्थळी महापौर विनिता राणे, स्वीकृत नगरसेवक विश्वनाथ राणे आदी उपस्थित असून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
Thane: Fire broke out at a rubber company in Dombivli last night; firefighting operations underway. No casualties reported. More details awaited. #Maharashtrapic.twitter.com/OGtqR3riND
— ANI (@ANI) October 8, 2018