मुंब्रा बायपास रस्त्यावर डंपरला आगा 

By कुमार बडदे | Updated: May 6, 2024 21:56 IST2024-05-06T21:56:31+5:302024-05-06T21:56:52+5:30

या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही.परंतु डंपर मात्र मोठ्या प्रमाणावर जळाला असल्याची माहिती ठामपाच्या अप्तकालिन कक्षातील अधिका-यांनी दिली.

fire to dumper on Mumbra bypass road | मुंब्रा बायपास रस्त्यावर डंपरला आगा 

मुंब्रा बायपास रस्त्यावर डंपरला आगा 

मुंब्राः येथील बायपास रस्त्यावरून चाललेल्या डंपरला आग लागल्यामुळे या रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. वाड्याहून मुंब्रा बायपास मार्गे नवी मुंबईच्या दिशेने ३४ टन बारीक खडी घेऊन चाललेल्या डंपरला सोमवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आग लागली.

याबाबतची माहिती मिळताच वाहतूक शाखेचे तसेच स्थानिक पोलिस अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली,जवानांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी तसेच दोन फायर आणि एक रेस्क्यू वाहनांच्या मदतीने अथक प्रयत्नानी रात्री पावणेसात वाजता आग विझवली.आग लागल्या नंतर डंपर चालक वाहन सोडून पसार झाला.

या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही.परंतु डंपर मात्र मोठ्या प्रमाणावर जळाला असल्याची माहिती ठामपाच्या अप्तकालिन कक्षातील अधिका-यांनी दिली. या अपघातामुळे येथील रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी झाल्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
 

Web Title: fire to dumper on Mumbra bypass road