कल्याण-डोंबिवली रस्त्यावर चालत्या गाडीला आग, सुदैवाने प्रवासी बचावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2018 17:51 IST2018-01-20T17:51:00+5:302018-01-20T17:51:06+5:30

कल्याण डोंबिवली रेल्वे समांतर रस्त्यावर दुपारी साडेचारच्या सुमारास चालत्या कारला भीषण आग लागली.

A fire in a moving vehicle on the Kalyan-Dombivli road, fortunately the passengers escaped | कल्याण-डोंबिवली रस्त्यावर चालत्या गाडीला आग, सुदैवाने प्रवासी बचावले

कल्याण-डोंबिवली रस्त्यावर चालत्या गाडीला आग, सुदैवाने प्रवासी बचावले

कल्याण - येथील कल्याण डोंबिवली रेल्वे समांतर रस्त्यावर दुपारी साडेचारच्या सुमारास चालत्या कारला भीषण आग लागली यावेळी गाडीत पँसेंजर होते परंतू ते वेळीच गाडीबाहेर पडल्याने जिवीतहानी टळली. ही कार सीएनजी होती. टिटवाळा येथून ठाकुर्ली येथे काहीजण धार्मिक कार्यक्रमासाठी आले होते. 

गाडी समांतर रस्त्यावर येताच गाडीच्या इंजिनातून अचानक धूर येऊ लागला. त्याचवेळी आतील  चालकाने गाडी थांबवून प्रवाशांसह बाहेर पळ काढला. गाडीने पेट घेतला आणि भीषण लागलेल्या आगीत तीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. घटनास्थळी धाव अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले.

Web Title: A fire in a moving vehicle on the Kalyan-Dombivli road, fortunately the passengers escaped