शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मतदानाचा उत्साह कायम
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
5
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
6
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
7
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
8
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
9
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
10
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
11
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
12
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
13
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
14
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
15
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
16
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
17
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
18
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
19
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
20
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...

ठाणेकरांचं जीवन गॅसवर? आगीच्या घटनांमध्ये सात वर्षांत दुप्पट वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 11:44 PM

शहराची आजची लोकसंख्या २३ लाखांच्या घरात आहे. लोकसंख्येच्या मानाने आजघडीला १४ अग्निशमन केंद्रांची आवश्यकता असताना शहरात केवळ सात केंद्रे आहेत.

ठाणे : वाढती लोकसंख्या आणि वाढत्या शहरीकरणाबरोबरच ठाणे शहरात मागील सात वर्षांत आगीच्या घटनांमध्येही तिपटीने वाढ झाली आहे. २०१३ मध्ये शहरात ३३२ आगीच्या घटना घडल्या होत्या. २०१८ मध्ये तब्बल ८४२ घटना घडल्या, तर २०१९ मध्ये आगीच्या ७८२ घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे एकीकडे आगीबाबत विविध सोसायट्यांना प्रशिक्षण दिले जात असल्याचा दावा केला जात आहे. परंतु, असे असतानाही या वाढत्या घटनांमध्ये ठाणे आता आगी लागण्याचे केंद्र बनते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.

शहराची आजची लोकसंख्या २३ लाखांच्या घरात आहे. लोकसंख्येच्या मानाने आजघडीला १४ अग्निशमन केंद्रांची आवश्यकता असताना शहरात केवळ सात केंद्रे आहेत. तर, लोकसंख्येच्या मानाने या अग्निशमन केंद्रांसाठी ४३५ जणांचा स्टाफ आवश्यक असतानादेखील ३४० अधिकारी, कर्मचारी आहेत. पर्यवेक्षक, तांडेल, वाहनचालक आणि फायरमन यांची कित्येक पदे रिक्त आहेत. एका अग्निशमन केंद्रासाठी तीन पाळ्यांमध्ये ३२ अधिक सहा असे ३८ कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ आवश्यक आहे. परंतु, सध्या प्रत्येक केंद्रावर मनुष्यबळाची वानवा आहे.असे असताना २०१३ पासून ते आजघडीला शहराची लोकसंख्याही वेगाने वाढत आहे. वाहनांची संख्याही वेगाने वाढत आहे. परंतु, शहराचा आवाका वाढत नाही. मात्र, आगीच्या घटना वेगाने वाढत आहेत. नव्या इमारतींना एनओसी देताना दोन जिन्यांची गरज आवश्यक केली आहे. परंतु, त्याची योग्य ती दखल घेतली जाते का? हादेखील प्रश्न आहे.ठाणे शहरात २०१३ मध्ये आगीच्या ३३२ घटना घडल्या आहेत. २०१४ मध्ये त्यात वाढ होऊन त्यांची संख्या ५०४ एवढी झाली. तर, २०१५ मध्ये ५१३ तसेच २०१६ मध्ये मात्र आगीच्या घटनांमध्ये घट झाल्याचे दिसून आले. या वर्षभराच्या कालावधीत ३९५ आगीच्या घटना घडल्या आहेत. तर, २०१७ मध्ये पुन्हा वाढ झाल्याचे दिसून आले आहे. या कालावधीत ६०४, सन २०१८ मध्ये ८४२ तर २०१९ मध्ये आगीच्या घटनांमध्ये काहीशी घट होऊन ही संख्या ७८२ एवढी दिसून आली आहे.

टॅग्स :fireआग