Fire at electricity meter box in Thane; Burn 25 to 30 meter box | ठाण्यात विद्युत मीटर बॉक्सला आग; २५ ते ३० मीटर बॉक्स जळून खाक

शॉटसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता

ठळक मुद्दे ‘लोकपूरम कॉम्प्लेक्स’ मधील घटना शॉटसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: येथील ‘लोकपूरम कॉम्प्लेक्स’ मधील सीतार बिल्डींग ‘बी विंग’ मध्ये रविवारी सकाळी मीटर बॉक्सला आग लागली. यामध्ये जवळपास २५ ते ३० मीटर जळाले. ही आग शॉटसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या सूत्रांनी वर्तविली आहे.
तळ अधिक सहा मजली ही सीतार बिल्डींग आहे. सकाळी ११ ते ११.३० वाजण्याच्या सुमारास अचानक तेथील मीटर बॉक्सला आग लागली. यामध्ये सर्व मीटर बॉक्स जळाले आहेत. आगीची माहिती मिळताच ठाणे महापालिकेचे अग्निशमन दलाबरोबर आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे पथक, महावितरण आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीची माहिती मिळताच सोसायटीतील राहिवाशांनीही बाहेर धाव घेतली. तर काही जण याठिकाणी अडकले होते. त्यांना अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले. या घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. शॉटसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Fire at electricity meter box in Thane; Burn 25 to 30 meter box

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.