डोंबिवलीत पेरोक्सि केम कंपनीला आग; एक कामगार जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 15:50 IST2019-09-09T15:42:41+5:302019-09-09T15:50:07+5:30
आग विझविण्याचे काम सुरु आहे.

डोंबिवलीत पेरोक्सि केम कंपनीला आग; एक कामगार जखमी
ठळक मुद्दे सचिन देशमुख (४०) हा कामगार या आगीत जखमी झाला ही केमिकल कंपनी असून आगीमुळे भयभीत झालेले कामगार कंपनी बाहेर पळाले आहेत.
डोंबिवली - डोंबिवली पूर्वेकडील एमआयडीसी परिसरात असलेल्या क्लासिक हॉटेलजवळील पेरोक्सि केम कंपनीत स्फोट झाल्याने कंपनीला आग लागली आहे. ही केमिकल कंपनी असून आगीमुळे भयभीत झालेले कामगार कंपनी बाहेर पळाले आहेत. सचिन देशमुख (४०) हा कामगार या आगीत जखमी झाला असून तो सुपरवायझर म्हणून नोकरी करतो. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या आल्या असून आग विझविण्याचे काम सुरु आहे.
डोंबिवलीत एमआयडीसी परिसरात पेरोक्सि केम कंपनीला आग https://t.co/mD82AaLdlV
— Lokmat (@MiLOKMAT) September 9, 2019