अग्निशमन दलाचा परवाना ३५० खाजगी क्लासेसना नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 12:02 AM2019-05-28T00:02:16+5:302019-05-28T00:02:22+5:30

सूरत येथे खाजगी क्लासेसमधील आगीत २२ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.

Fire brigade license does not have 350 private classes | अग्निशमन दलाचा परवाना ३५० खाजगी क्लासेसना नाही

अग्निशमन दलाचा परवाना ३५० खाजगी क्लासेसना नाही

googlenewsNext

मीरा रोड : सूरत येथे खाजगी क्लासेसमधील आगीत २२ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर मीरा भाईंदरमधील तब्बल ३५० खाजगी क्लासेसना अग्निशमन दलाने पाहणी करुन परवानाच दिला नसल्याचे उघड झाले आहे. तर बक्कळ फायद्यासाठी बहुतांश क्लासेसमध्ये अतिशय दाटीवाटीने विद्यार्थ्यांना बसवले जात असून हजारो विद्यार्थ्यांची सुरक्षितता वाऱ्यावर आहे. अग्निशमन यंत्रणा लावण्याकडे क्लास चालकांकडून सोयीस्कर डोळेझाक केली जात असताना महापालिकाही आपली जबाबदारी झटकत आहे.
सूरतमधील खाजगी क्लासमध्ये लागलेल्या भीषण आगीत २२ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यानंतर गुजरात सरकारने आता अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यासह क्लासच्या चालकावर गुन्हा दाखल केला आहे. तर महाराष्ट्रात मात्र सरकारने खाजगी शिकवणी अधिनियम २०१८ अजूनही अमलात आणण्यास टाळाटाळ चालवली आहे. सूरत येथील अग्नीकांडानंतर मीरा भार्इंदर मध्ये चालणाºया सुमारे ३५० खाजगी क्लासमधील हजारो विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
गलेलठ्ठ फी वसूल करणाºया क्लास चालकांकडून मीरा भार्इंदरमध्ये सर्रास जुन्या इमारती, गाळे, सदनिकांमधून खाजगी क्लास चालवले जातात. बहुतांश क्लास अरुंद व दाटीवाटीच्या जागेत चालवले जात आहेत. त्यातच जास्तीतजास्त विद्यार्थी बसवता यावे म्हणून विद्यार्थ्यांना बसण्यासाठी ठेवले जाणारे बेंचही अतिशय चिकटवून ठेवले जातात. शेळ्या - मेंढ्या कोंबाव्यात तसे विद्यार्थी कोंबून बसवले जातात. विद्यार्थ्यांना क्लासेसमधून बाहेर पडणारे मार्गही अडचणीचे व अरूंद असतात.
हवा खेळती राहण्यासाठी जागाच नसते. काही जण तर सरळ वातानुकूलित यंत्र लावण्याची शक्कल लढवतात.
अशी एकूणच स्थिती असताना क्लासेसमध्ये अग्निशमन यंत्रणाही लावली जात नाही. महत्वाचे म्हणजे महापालिकेनेही खाजगी क्लासेसकडे कानाडोळाच चालवला
आहे.
क्लासेसमध्ये मोठ्या संख्येने दाटीवाटीत विद्यार्थी वावरत असताना तेथील सुरक्षिततेचा आढावाच आजपर्यंत घेतलेला नाही. अग्निशमन दलही नियमांचा हवाला देत खाजगी क्लासेसमध्ये निदान अग्निशमन यंत्रणा तसेच सुरक्षिततेच्या उपाययोजना आहेत का ? याची पाहणीही करत नाहीत.
>खाजगी क्लासेस केवळ गल्लाभरु काम करत आहेत. त्यांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी सोयरसूतक नाही. सूरतची भयाण अशी दुर्घटना घडल्यानंतर सरकारी यंत्रणा जागी झाली. मीरा भार्इंदर मधील ज्या खाजगी क्लासेसमध्ये सुरक्षिततेची काळजी घेतली जात नाही ते तातडीने बंद करुन गुन्हे दाखल करा. बेजबाबदार अधिकाºयांना निलंबित करा.
- सागर सावंत, निरीक्षक, युवासेना
>शहरातील शाळा, क्लासेसमध्ये अग्निशमन यंत्रणा नसल्याबद्दल मुख्यमंत्र्यांपर्यंत तक्रार केली आहे. याला जबाबदार संचालकांसह पालिकेच्या अग्निशमन दलाचे अधिकारी, उपायुक्त यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे.
- प्रदीप जंगम, सामाजिक कार्यकर्तेदरमधील स्थिती : विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात
>येत्या चार दिवसात अग्निशमन दलाच्या वतीने खाजगी क्लासेसची अचानक जाऊन पाहणी केली जाईल. तेथील आगसुरक्षा आदी बाबतचा आढावा घेऊन अहवाल तयार करणार आहोत. सदोष क्लासेसविरोधात कारवाई करु . - प्रकाश बोराडे, प्रभारी, अग्निशमन दलप्रमुख

Web Title: Fire brigade license does not have 350 private classes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.