कल्याणमध्ये भंगाराच्या दुकानाला लागली आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2020 21:01 IST2020-04-09T21:00:10+5:302020-04-09T21:01:55+5:30
आगीची माहिती मिळतच अग्निशमच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

कल्याणमध्ये भंगाराच्या दुकानाला लागली आग
ठळक मुद्देसोशल डिस्टन्सिंगच्या नियमाची पायमल्ली झाल्याचे दिसून आले आहे.सुदैवाने या आगीत कोणालाही दुखापत झाली नाही.
कल्याण - पूर्वेतील विजयनगर परिसरात रोडच्या कडेला असलेल्या एका भंगारच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडली.
आगीची माहिती मिळतच अग्निशमच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. दरम्यान, आग लागल्याची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने आग पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी जमा झाला होती. यामुळे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाची पायमल्ली झाल्याचे दिसून आले आहे. सुदैवाने या आगीत कोणालाही दुखापत झाली नाही.