भिवंडी शहरात पुन्हा अग्नितांडव, उजागर डाईंगला भीषण आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2018 11:57 IST2018-12-31T09:31:05+5:302018-12-31T11:57:19+5:30
भिवंडीमध्ये सरवली एमआयडीसी परिसरातील उजागर डाईंगला सोमवारी (31 डिसेंबर) भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे.

भिवंडी शहरात पुन्हा अग्नितांडव, उजागर डाईंगला भीषण आग
ठाणे - भिवंडीमध्ये सरवली एमआयडीसी परिसरातील उजागर डाईंगला सोमवारी (31 डिसेंबर) भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या काही गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
उजागर डाईंगला लागलेल्या भीषण आगीमध्ये 12 ते 13 डाईंग जाळून खाक झाले आहेत. भिवंडी, कल्याण, एमआयडीसी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे.
Latest visuals from Thane: Fire broke out in a cloth factory in Bhiwandi, earlier this morning. Three fire tenders present at the spot. More details awaited. #Maharashtrapic.twitter.com/oWcjCpiLVn
— ANI (@ANI) December 31, 2018
Thane, Maharashtra: Fire breaks out in a cloth factory in Bhiwandi. Three fire tenders present at the spot. pic.twitter.com/lhKqh9Ntg9
— ANI (@ANI) December 31, 2018