भिवंडीतील केमिकल गोदामाला भीषण आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2018 16:51 IST2018-08-19T16:14:34+5:302018-08-19T16:51:29+5:30

भिवंडीतील दापोडा परिसरात असलेल्या पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे.

fire breaks at chemical company in bhiwandi dapoda area | भिवंडीतील केमिकल गोदामाला भीषण आग

भिवंडीतील केमिकल गोदामाला भीषण आग

ठाणे : भिवंडी तालुक्यातील दापोडा परिसरात असलेल्या पारसनाथ कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. वेदांत ग्लोबल वेअर गोडाऊनला ही आग लागली आहे. गोडाऊनमध्ये हायड्रोजन पेरॉक्साडसह इतर केमिकलचा साठा असल्याची माहिती मिळत आहे.

आगीमुळे परिसरात धुराचे साम्राज्य निर्माण झाले असून धुरामुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास होत आहे. अग्निशामक दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी भिवंडी, कल्याण येथील अग्निशामक दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

Web Title: fire breaks at chemical company in bhiwandi dapoda area