शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
6
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
7
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
8
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
9
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
10
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
11
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
12
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
13
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
14
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
15
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
16
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
17
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
18
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
19
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
20
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी

मराठी विषय न शिकविणाऱ्या शाळेकडून लाखाचा दंड आकारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 12:10 AM

संडे अँकर । शिक्षक सेनेची मागणी : कायद्यातील तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी सूचना, शिक्षण उपसंचालकांना अधिकार द्यावा

जान्हवी मोर्ये।लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : राज्य सरकारने सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा विषय शिकवणे अनिवार्य केले आहे. त्यासाठी कायदाही केला असून त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी काही तांत्रिक अडचणी दूर करण्याबाबत शिक्षक सेनेने शिक्षणमंत्र्यांना सूचना केल्या आहेत. तसेच मराठी भाषा न शिकवणाºया शाळांना एक लाखांपर्यंत दंड ठोठावण्याची मागणीही करण्यात आली आहे.कोणत्याही कारणासाठी मराठी भाषा विषय शिकवण्यापासून शाळांना सूट दिली जाऊ नये. यासंबंधी शाळांना दंड ठोठावण्याचा प्राधिकृत अधिकार शिक्षण उपसंचालकांना देण्यात यावा, तर या निर्णयाविरुद्ध अपीलिय अधिकारी म्हणून शिक्षण आयुक्तांची नेमणूक करा, अशी व्यवस्था करण्याची सूचनाही शिक्षक सेनेने केली आहे. याबाबत महाराष्ट्र शिक्षक सेना प्रांताध्यक्ष व अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष ज.मो. अभ्यंकर यांनी शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी तयार करण्यात येणाºया नियमावलीत काही मुद्द्यांचा विचार करण्यात यावा, असेही यात सुचवले आहे. त्यामध्ये कोणत्या तारखेपासून कायदा लागू होईल, याची अधिसूचना सरकारला काढावी लागेल.सध्याच्या आदेशाची राज्यात अंमलबजावणी सुरू केल्यास त्याला संस्थाचालक त्याच्या वैधतेला आव्हान देऊ शकतात. जी अभ्यासमंडळे त्यांच्या भाषारचनेत मराठी ही दुसरी आणि तिसरी भाषा म्हणून शिकवली जात असल्यास त्यात्या मंडळाचे अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तके त्या मंडळाने ठरवल्यानुसार ठेवावी.यांना सूट देण्यात यावीइतर देशांतून आलेला विद्यार्थी सहावीनंतर शाळेत आल्यास आणि पूर्वीच्या वर्गात मराठी भाषा शिकला नसल्यास, मतिमंद आणि अध्ययन अक्षम विद्यार्थ्यांना सक्षम प्राधिकाऱ्यांनी प्रमाणित केले असल्यास, कोणत्याही अपवादात्मक परिस्थितीमध्ये एखादा विद्यार्थी मराठी भाषेचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यास असमर्थ असल्याचे आयुक्त (शिक्षण) यांची खात्री पटल्यास त्या विद्यार्थ्याला मराठी भाषा शिकण्यातून सूट मिळावी, असेही पत्रात नमूद केले आहे. दरम्यान, इयत्ता पहिली ते पाचवीत बाहेरच्या देशातून आलेल्या विद्यार्थ्याला मराठीचा अभ्यासक्रम पहिल्या वर्षी लागू असावा, असे म्हटले आहे.च्मराठी विषय भाषारचनेत असतानाही जे विद्यार्थी मराठीऐवजी अन्य भाषेची निवड करतील, त्यांना सरकार निर्धारित करील तो मराठीचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागेल.च्तसेच मंडळाच्या भाषारचनेत मराठी भाषेचा अंतर्भाव नसल्यास त्याच्याशी संलग्न सर्व शाळांना सरकार ठरवेल, तो मराठीचा अभ्यासक्रम अनिवार्य करावा.च्मराठीच्या तासात आपसात आणि मराठीच्या शिक्षकांशी वर्गाबाहेर शाळेच्या परिसरात मराठीत बोलण्यावर बंधन आणता येणार नाही.च्तसेच, मराठी भाषा न शिकविणाºया शाळांचे ना हरकतपत्र रद्द करण्याचा अधिकार विभागीय शिक्षण उपसंचालकास, तर मान्यता काढण्याचा अधिकार शासनाचा राहील.च्तसेच कायद्यातील तरतुदी अमलात आणण्यासाठी सक्षम प्राधिकाºयाची नियुक्ती करावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.