ठाणे : कोकणातील राजापूर विधानसभेतील माजी आमदार राजन साळवी यांनी उद्धव सेनेचे शिवबंधन ताेडत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत गुरुवारी ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंदाश्रमात शिंदे सेनेत प्रवेश केला. 'काेकणचा ढाण्या वाघ' खऱ्या गुहेत परतला. आपण मुख्यमंत्री झालाे, त्याचवेळी साळवी येतील, अशी अपेक्षा हाेती. परंतू, काही गाेष्टींना याेगायाेग जुळवून यावा लागताे. आता खऱ्या शिवसेनेच्या प्रवाहात ते आले असल्याचे सांगत शिंदे यांनी साळवी यांच्यासह उद्धव सेनेततून आलेल्यांचे त्यांनी स्वागत केले. या पक्ष प्रवेशाच्या निमित्ताने शिंदे यांनीही जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. साळवी यांच्या प्रवेशाने आता कोकणात शिंदेंची ताकद वाढली आहे.उद्धव सेनेच उपनेते आणि माजी आमदार राजन साळवींनी आपल्या कुटूंबीय तसेच शेकडाे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसह शिंदे सेनेत प्रवेश केला.शिंदें आणि उद्याेगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला.ज्या पक्षाच्या विचाराला लागली वाळवी, तिथे कसा राहील राजन साळवी, अशी कोटी करीत शिंदेंनी यावेळी उद्धव ठाकरेंना टोलाही लगावला. यावेळी साळवी हा ढाण्या वाघ पुन्हा गुहेत आलेला आहे, अशा शब्दात शिंदेंनी त्यांचे पक्षात स्वागत केले. साळवींनी शिवसेनेत नगराध्यक्ष, जिल्हाप्रमुख, उपनेते पद अशी पदे भूषवली. ते तीन टर्म आमदार राहिले. चौथ्यांदाही झाले असते. आपल्याला किरण आणि उदय सामंत सारखे सांगत होते. त्यांना पक्षात घ्या आणि विधानसभेचे तिकीट द्या. पण काही गोष्टींसाठी योगायोग जुळून यावा लागतो, असे शिंदे म्हणाले.साळवींच्या पक्षप्रवेशावेळी शिंदेंनी विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव करणाऱ्या किरण सामंत यांचं विशेष कौतुक केले. पक्ष, संघटना मोठी होत असेल तर आम्हाला आनंद आहे. आमची किंमत पक्षामुळे असल्याचे किरण सामंत म्हणाल्याचा उल्लेख शिंदेंनी यावेळी केला.दाेन्ही डाेळयात आश्रू- साळवी२००० साली शिवसेना जिल्हाप्र्रमुख झालाे, त्यावेळी कै. आनंद दिघेंनी आपला सत्कार केला. आता शिंदे यांनी सत्कार केला. एका डाेळयात दु:खाश्रू तर दुसऱ्या डाेळयात आनंदाश्रू असल्याची भावना यावेळी साळवी यांनी व्यक्त केली. ३८ वर्षे नगरसेवक ते आमदार अशी पदे मिळालेला ताे पक्ष साेडला. या पक्ष प्रवेशामुळे दुसऱ्या डाेळयात आनंदाश्रू असल्याचे ते म्हणाले. अडीच वर्षापूर्वी जाऊ शकलाे, नसल्याची सल असल्याचेही ते म्हणाले.
अखेर राजन साळवी शिंदे सेनेत! "काेकणचा वाघ खऱ्या गुहेत परतला...", म्हणत DCM शिंदेंकडून स्वागत
By जितेंद्र कालेकर | Updated: February 13, 2025 21:57 IST