अखेर प्रिती भावरच्या मारेक-याला अटक: ठाणे ग्रामीण पोलिसांची कारवाई

By जितेंद्र कालेकर | Published: October 3, 2019 10:46 PM2019-10-03T22:46:45+5:302019-10-03T22:53:44+5:30

भिवंडीतील घोटगाव, गोठणपाडा गावातील प्रीती भावर (२८) या महिलेवर लैंगिक अत्याचार करुन तिचा खून करणारा तिचाच नातेवाईक असल्याचे तपासात समोर आले आहे. रमेश लाडक्या भावर (५०) असे याप्रकरणी अटक केलेल्या तिच्या सास-याचे नाव आहे. ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने त्याला नुकतीच अटक केली.

 Finally Preity Bhawar's murder case detected: accused arrested by Thane rural police | अखेर प्रिती भावरच्या मारेक-याला अटक: ठाणे ग्रामीण पोलिसांची कारवाई

स्थानिक गुन्हे शाखेने केला कौशल्याने तपास

Next
ठळक मुद्देअत्याचार करुन खून करणार निघाला जवळचा नातेवाईकस्थानिक गुन्हे शाखेने केला कौशल्याने तपासगेल्या १५ दिवसांपासून सुरु होता तपास

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: भिवंडी तालुक्यातील महाळुंगे गावच्या प्रिती भावर (२८) या महिलेवर अत्याचार करुन अमानुषपणे खून करणा-या रमेश लाडक्या भावर (५०) याला ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने नुकतीच अटक केली आहे. त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
कामावरुन परतणा-या प्रिती या महिलेला रस्त्यात अडवून तिला निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर १५ सप्टेंबर रोजी अमानुष अत्याचारानंतर निर्घृण खून करण्यात आला होता. याप्रकरणी गणेशपुरी पोलीस आणि ठाणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने सर्व पातळयांवर तपास यंत्रणा सक्रीय केली होती.
तिच्या खून्यांना तात्काळ अटकेच्या मागणीसाठी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी २० सप्टेंबर रोजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांची भेट घेऊन यातील आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली होती. या घटनेची अत्यंत गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक राठोड, अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय पाटील आणि स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक परशुराम लोंढे, गणपत सुळे, उमेश ठाकरे, पोलीस नाईक हणमंत गायकर, अमोल कदम आणि पोलीस कॉन्स्टेबल रवी राय आदींच्या पथकाने १ आॅक्टोंबर रोजी रमेश भावर याला ताब्यात घेतले. तिचे त्याच्याशी सासºयाचे नाते आहे. त्याची तिच्यावर अनेक दिवसांपासून वाईट नजर होती. १५ सप्टेंबर रोजीही तो गोठगाव भागातील जंगलातच घुटमळत होता, अशी माहिती या पथकाला मिळाल्यानंतर त्याची त्या दिवशीची संपूर्ण दिनचर्या पोलिसांनी पडताळली. त्याने दिलेल्या माहितीमध्ये विसंगती आढळल्यानंतर पोलिसांनी आपल्या खास शैलीत त्याला बोलते केले. त्यानंतर आपल्याकडून ही आगळीक झाल्याची त्याने कबूली दिली.
........................
काय घडला होता प्रकार
वालीव येथे कामाला जाणारी प्रिती ही विवाहिता १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घरी पायी जात होती. त्यावेळी गोठगाव परिसरात रमेश याने तिला गाठले. तिला जंगलाच्या बाजूने नेत तिच्यावर त्याने लैंगिक अत्याचार केला. तिने विरोध केल्याने तसेश आपले बिंग फुटू नये म्हणून त्याने तिचे डोके दगडावर आपटले. यात ती बेशुद्ध पडल्यानंतर तिच्याच साडीने तिला गळफास देऊन तिची हत्या केल्याची त्याने कबूली पोलिसांना दिली. पती आणि पाच वर्षांची मुलगी तिच्या मागे असून सामान्य घरातील या महिलेचा अत्याचारानंतर निर्घृण खून झाल्याने संपूर्ण ठाणे जिल्हयात संताप व्यक्त होत होता.
गणेशपुरी विभागाचे पोलीस उपअधीक्षक दिलीप गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक महेश सागडे यांचे पथकही या प्रकरणाचा समांतर तपास करीत होते.
पोलिसांनी सखोल तपास करीत आरोपीला अटक केल्याने प्रितीच्या मारेकºयांच्या अटकेसाठी पाठपुरावा करणाºया जिजाऊ महिला सक्षमीकरण प्रमुख मोनिका पानवे यांनी समाधान व्यक्त केले आहे. पोलिसांच्या कारवाईने महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल, असे झडपोली येथील जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या सदस्या भावना घाटाल यांनी म्हटले आहे.

Web Title:  Finally Preity Bhawar's murder case detected: accused arrested by Thane rural police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.