अखेर अतिधोकादायक गोडसे इमारतीवर महापालिकेचा हातोडा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2019 06:27 PM2019-08-08T18:27:04+5:302019-08-08T18:27:10+5:30

गाळेधारक, भाडेकरुंना नोटीस, भोगवटा प्रमाण पत्राचे वाटप; तातडीने पाडकाम कारवाईला सुरुवात

Finally, the municipal's hammer on dangerous Godse building | अखेर अतिधोकादायक गोडसे इमारतीवर महापालिकेचा हातोडा

अखेर अतिधोकादायक गोडसे इमारतीवर महापालिकेचा हातोडा

Next
ठळक मुद्देदुपारी अडीच नंतर इमारत मोकळी करुन घेतल्यानंतर तातडीने पाडकाम कारवाईला सुरुवात करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

डोंबिवली - पश्चिमेकडील महात्मा फुले पथावरील ४० वर्षे जून्या अतिधोकादायक दोन मजली गोडसे इमारतीवर अखेर गुरुवारपासून महापालिकेने हातोडा फिरवला. बुधवारच्या एका दुस-या मजल्यावरील घरामध्ये स्लॅब कोसळून ५२ वर्षीय विकास फडके या रहिवाश्याचा त्या दुर्घटनेत जागीच मृत्यू झाला होता. त्या घटनेची राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी त्याची गंभीर दखल घेत माणसाचा जीव महत्वाचा असून तातडीने इमारत खाली करुन सगळयांचे हक्क राहण्यासाठी महापालिकेने भोगवटा प्रमाण पत्र देण्याचे आदेश कार्यकारी अभियंता सुनील जोशी यांना दिले होते.
त्यानूसार जोशींच्या मार्गदर्शनाखाली ह प्रभागक्षेत्र अधिकारी ज्ञानेश्वर कंखरे यांनी गुरुवारी सकाळपासून दुपारपर्यंत गाळेधारक, भाडेकरु यांना भोगवटा प्रमाण पत्र देत जागा तात्काळ खाली करण्याचे आदेश दिले होते. त्यानूसार दुपारी अडीच नंतर इमारत मोकळी करुन घेतल्यानंतर तातडीने पाडकाम कारवाईला सुरुवात करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. प्रभागक्षेत्र अधिका-यांच्या देखरेखीखाली ही कारवाई सुरु झाली असून पश्चिमेकडील महात्मा फुले रस्ता, गांधी रस्ता हे दोन्ही प्रचंड वर्दळीचे रस्ते त्या इमारतीलगत येतात. त्यामुळे त्या ठिकाणी पोकलेन, जेसीबी आणुन लगेच पाडकाम कारवाई करण्यासाठी काही अडथळे येत आहेत. रेल्वे स्थानकानजीक हमरस्ते व सदरहू इमारत असल्याने तेथून लाखो नागरिक, वाहनांची ये जा दिवस रात्र सुरु असते. त्यासाठी सुरक्षिततेच्या कारणास्तव कोणाचेही नुकसान होऊ नये, अपघात होऊ नये या उद्देशाने महापालिकेच्या कर्मचा-यांकडूनच कारवाईला दुपारी ३ वाजता सुरुवात झाली. पुढील काही दिवस ही पाडकाम कारवाई सुरु राहणार आहे. इमारत मालकाने वेळोवेळी रहवाश्यांना महापालिकेने दिलेल्या अतिधोकादायक इमारतीसंदर्भातीन नोटीसची माहिती दिल्याची माहिती स्थानिक नगरसेवक शैलेश धात्रक यांनी दिली.
दरम्यान बुधवारच्या दुर्घटनेत मयत झालेले रहिवासी फडके यांच्यावर बुधवारी रात्रीच त्यांच्या कुटूंबियांनी अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे धात्रक यांनी सांगितले. तसेच मयत फडके यांच्या वयोवृद्ध आईला त्यांचा दुसरा मुलगा घेऊन गेल्याचे सांगण्यात आले. जुनी डोंबिवली परिसरात ते रहात असल्याचे धात्रक म्हणाले.


 

गाळेधारक आधी इमारतीमधून निघायला तयार नव्हते, परंतू इमारत जीर्ण झाली असून कार्यकारी अभियंता सुनील जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे १८ जणांना नोटीस देत तातडीने जागा रिकामी करण्यास सांगितले, तसेच कागदपत्रांची पूर्तता करुन भोगवटा प्रमाणपत्र दिले. त्यानंतर सगळयांनी सामान काढुन जागा रिकामी केल्यावर दुसरा मजला निष्कसीत करण्याचे काम सुरु झाले आहे. - ज्ञानेश्वर कंखरे, ह प्रभागक्षेत्र अधिकारी
 

Web Title: Finally, the municipal's hammer on dangerous Godse building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.