शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्य सैनिकाची जमीन बळकवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून हक्क द्या; आदिवासी कुटुंबियांचे साकडे 

By धीरज परब | Updated: November 5, 2023 14:09 IST

मीरारोडच्या मीरा गावात राहणारे स्वातंत्र्य सैनिक कै . मोतीराम  काळ्या जाबर यांचे १९८८ साली निधन झाले .

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात लढलेल्या स्वातंत्र्य सैनिकाच्या आदिवासी कुटुंबावर हलाखीचे जीवन जगण्याची पाळी आली आहे . त्या स्वातंत्र्य सैनिकाची जमीन बनावट लोक व बनावट कागदपत्रां द्वारे कटकारस्थान करून लुबाडण्यात आली असून संबंधितांवर गुन्हे दाखल करून आमची जमीन आम्हाला परत करा अशी मागणी स्वातंत्र्य सैनिकाच्या वारसांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री पासून मीरा भाईंदर - वसई विरारच्या पोलीस आयुक्तां कडे केली आहे. 

मीरारोडच्या मीरा गावात राहणारे स्वातंत्र्य सैनिक कै . मोतीराम  काळ्या जाबर यांचे १९८८ साली निधन झाले . त्यांच्या वारसांनी केलेल्या तक्रारी नुसार मोतीराम जाबर हे आमचे आजोबा असून ते स्वातंत्र्य सैनिक तसेच आदिवासी कुटुंबातील होते . १९७३ साली  तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या स्वाक्षरीने त्यांना स्वातंत्र्य सैनिक म्हणून सन्मानपत्र देण्यात आले होते . काही वर्षां पूर्वी मीरा भाईंदर महापालिकेने देखील त्यांच्या वारसांना सन्मानपत्र दिले होते. 

आजोबांची १९५१ साला पासून संरक्षित कुळ म्हणून मौजे मिरे सर्व्हे क्र . १२७ / १ व नवीन ७ / १  मध्ये नोंद होती व ते त्याठिकाणी शेती करत होते . परंतु १९६३ साली जमीन आजोबांची जमीन हडपण्यासाठी मोतीराम जाबर यांच्या ऐवजी मोतीराम काळ्या पाटील  या नावाच्या बोगस व्यक्तीला पुढे करून त्या नावाने खोट्या सह्या व खोटी कागदपत्रे सादर केली . 

आश्चर्य म्हणजे १९७२ साली सातबारा नोंदी मेरुद्दिन इसाक पटेल व इत्तर यांचे कुळ म्हणून नाव लावण्यात आले . स्वातंत्र्य सैनिक व आदिवासीचे संरक्षित कुळ असताना पटेल व इत्तर यांचे कुळ कसे लागू शकते ? तर तहसीलदार यांनी २०१५ साली आम्हास आमचे आजोबा स्वातंत्र्य सैनिक कै . मोतीराम  काळ्या जाबर यांचे वारस म्हणून संरक्षित कुळ म्हणून घोषित केले होते . तसा आदेश त्यांनी दिला होता . 

मात्र संबंधित लोकांनी आमच्या आजोबा व नंतर आम्हा वारसांच्या अज्ञानी - अशिक्षितपणाचा गैरफायदा घेऊन आम्हाला आमच्या राह्यता घरातून आणि शेत जमिनीतून गुंडगिरी - दहशत माजवून बळजबरी हुसकावून लावले. आदिवासी संरक्षित कुळ असल्याने सदर जमीन विक्री व विकसित करण्यात अडचण येऊ नये म्हणून आधी पाटील नावाची बोगस व्यक्ती चे नावाचे पत्र देऊन आणि नंतर मेरुद्दिन इसाक पटेल व इत्तर यांचे कुळ म्हणून नाव लावण्यात आले . नंतर पटेल  यांचे कुळ काढून घेऊन जयराज देविदास व इतर यांनी स्वतःची नावे सात बारा नोंदी लावून घेतली असल्याचे स्वातंत्र्य सैनिकाच्या वारसांनी सांगितले . 

स्वातंत्र्य सैनिक व आदिवासी जमातीतले मोतीराम जाबर यांची तसेच त्यांचे वारस आदिवासी कुटुंबाची फसवणूक व अत्याचार करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा . आमच्या हक्काची जमीन आम्हाला मिळवून द्यावी अशी मागणी लेखी अर्ज द्वारे भानुमती करसन बरफ , असीना परशुराम वरठा , सोनल महेंद्र जाबर सह अन्य वारसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , शासकीय अधिकारी तसेच पोलीस आयुक्त मधुकर पांडेय आदींना केली आहे .  

स्वातंत्र्य सैनिकाचे हे आदिवासी वारसदार घरकाम , मजुरी आदी कामे करून चाळीत वा भाड्याच्या घरात राहून हलाखीचे जीवन जगत आहेत . कोट्यवधी रुपयांची जमीन असून देखील काही विकासक , कारस्थानी व अधिकारी यांच्या संगनमता मुळे हक्काची जमीन बळकावली गेल्याचे त्यांनी सांगितले . 

 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरPoliceपोलिस