व्हॉटसॲप पोस्टवरून सुरू झालेल्या वादातून मारामारी; घोडबंदर रोड भागातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 18:25 IST2022-03-07T18:23:31+5:302022-03-07T18:25:02+5:30
ठाणे : टीएमटी बस सुरू केल्याच्या श्रेयवादावरून सोसायटीच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर करण्यात आलेल्या पोस्टवरून उफाळलेला वाद हाणामारीपर्यंत जाण्याचा प्रकार घोडबंदर ...

व्हॉटसॲप पोस्टवरून सुरू झालेल्या वादातून मारामारी; घोडबंदर रोड भागातील घटना
ठाणे : टीएमटी बस सुरू केल्याच्या श्रेयवादावरून सोसायटीच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर करण्यात आलेल्या पोस्टवरून उफाळलेला वाद हाणामारीपर्यंत जाण्याचा प्रकार घोडबंदर रोड भागातील एका सोसायटीमध्ये शुक्रवारी घडला. सोसायटीमधील नागरिकांनी दिलेल्या तक्रारीवरून परस्परांविरुद्ध कासारवडवली पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले. घोडबंदर रस्त्यापासून काही अंतरावर असलेल्या या सोसायटीपर्यंत ठाणे स्टेशन येथून गेल्या वर्षी स्थानिक नगरसेवकांच्या पाठपुराव्यामुळे टीएमटीची बस सुरू झाली. मात्र ही बस लहान असल्याने प्रवाशांसाठी अपुरी पडू लागली. त्यामुळे या मार्गावर परिवहन सेवेने मोठी बस उपलब्ध करून दिली. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला.
सोसायटीतील सभासदांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर याच सोसायटीमध्ये राहणाऱ्या शिवसेनेच्या एका महिला पदाधिकाऱ्याने स्थानिक नगरसेवकाच्या पाठपुराव्यामुळे ही बस चालू झाल्याची पोस्ट केली. ही पोस्ट वाचल्यानंतर याच सोसायटीतील सदस्याने शिवसेनेच्या एका महिला नेत्याने व नगरसेवकाने ही बस सुरू करण्यास मदत केली, अशी पोस्ट ग्रुपवर केली. सोसायटीमधील आणखी एका रहिवाशाने बसच्या ‘मागे-पुढे त्यांचे नाव टाकून घ्या’, ही पोस्ट केली. यावरून ग्रुपवर वादविवाद होऊन त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. याबाबतीत परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल झाले.