शेलार ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना पंधराहजार शंभर रुपये बोनस जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2021 17:05 IST2021-11-01T17:05:05+5:302021-11-01T17:05:48+5:30

शहरालगत असलेल्या शेलार ग्राम पंचायतीच्या कर्मचाऱ्यांना पंधरा हजार शंभर रुपये बोनस जाहीर झाला आहे.

fifteen thousand one hundred bonus announced to Shelar Gram Panchayat employees | शेलार ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना पंधराहजार शंभर रुपये बोनस जाहीर

शेलार ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना पंधराहजार शंभर रुपये बोनस जाहीर

भिवंडीः शहरालगत असलेल्या शेलार ग्राम पंचायतीच्या कर्मचाऱ्यांना पंधरा हजार शंभर रुपये बोनस जाहीर झाला आहे. शेलार ग्राम पंचायतीचे सरपंच ऍड किरण चन्ने यांनी ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी तब्बल पंधरा हजार शंभर रुपये बोनस जाहीर केला असून बोनसची हि रक्कम मनपा कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या बोनसपेक्षा अधिक असल्याने शेलार ग्राम पंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी सरपंच चन्ने यांच्यासह ग्रामसेवक व संपूर्ण सदस्यांचे आभार मानले आहेत.

ग्राम पंचायत कर्मचारी वर्षभर इमानदारीने आपले कर्तव्य बजावत असून कोरोना संकटात देखील कर्मचाऱ्यांनी खूप परिश्रम घेतले आहे त्यांच्या या सेवा कार्याची दखल घेत कर्मचाऱ्यांसाठी पंधरा हजार शंभर रुपये बोनस जाहीर करण्यात आला आहे अशी प्रतिक्रिया शेलार ग्राम पंचायतीचे सरपंच ऍड किरण चन्ने यांनी दिली आहे. 
 

Web Title: fifteen thousand one hundred bonus announced to Shelar Gram Panchayat employees