उल्हासनगर महापालिकेच्या आवाहनाला फेडरल बँकेचा प्रतिसाद, सीएसआर मधून दिले १६ ट्रॅफिक बॅरीकेट्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 23:02 IST2026-02-09T23:02:27+5:302026-02-09T23:02:46+5:30

उल्हासनगर महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी शहरातील विकासक व बँकांना शहराच्या सुशोभीकरणासाठी आणि आवश्यक सोयीसुविधांसाठी आपल्या सीएसआर निधीतून मदत करण्याचे आवाहन केले होते.

Federal Bank responds to Ulhasnagar Municipal Corporation's appeal, provides 16 traffic barricades through CSR | उल्हासनगर महापालिकेच्या आवाहनाला फेडरल बँकेचा प्रतिसाद, सीएसआर मधून दिले १६ ट्रॅफिक बॅरीकेट्स

उल्हासनगर महापालिकेच्या आवाहनाला फेडरल बँकेचा प्रतिसाद, सीएसआर मधून दिले १६ ट्रॅफिक बॅरीकेट्स

उल्हासनगर : शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुव्यवस्थित करण्यासाठी आणि महापालिकेच्या सीएसआर उपक्रमाला बळ देण्यासाठी फेडरल बँकेने महापालिकेला १६ लोखंडी बॅरीकेट्स दिल्या आहेत. त्याचे लोकार्पण सोमवारी महापौर अश्विनी निकम, आयुक्त मनिषा आव्हाळे, माजी महापौर पंचम कलानी, नगरसेविका संघामित्रा हजारे आदीच्या उपस्थित महापालिका मुख्यालय येथे झाले.

 उल्हासनगर महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी शहरातील विकासक व बँकांना शहराच्या सुशोभीकरणासाठी आणि आवश्यक सोयीसुविधांसाठी आपल्या सीएसआर निधीतून मदत करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला फेडरल बँकेने त्वरित प्रतिसाद देत १६ बॅरीकेट्स उपलब्ध करून दिल्या आहेत. महापालिका मुख्यालयात सोमवारी झालेल्या एका विशेष कार्यक्रमात महापौर अश्विनी निकम, आयुक्त मनिषा आव्हाळे यांच्या हस्ते या बॅरीकेट्सचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी फेडरल बँकेचे संतोष भोके (राज्य व्यवसाय प्रमुख), माधुरी साजणीकर (नवी मुंबई प्रादेशिक प्रमुख), प्रदिपकुमार (मंडल प्रमुख) आणि निकिता करूणाकरण (शाखा प्रमुख) आदिजण उपस्थित होते. तसेच महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त किशोर गवस, धीरज चव्हाण, उपायुक्त दिपाली मोटघरे, जनसंपर्क अधिकारी अजय साबळे, गणेश शिंपी, छाया डांगळे यांसह अन्य अधिकारी उपस्थित होते. 

वाहतूक नियंत्रणास होणार मदत 
शहरातील वाढती गर्दी आणि वाहतुकीच्या समस्या लक्षात घेता, हे १६ लोखंडी बॅरीकेट्स अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. विशेषतः सण-उत्सव आणि गर्दीच्या ठिकाणी वाहतूक वळवण्यासाठी किंवा नियंत्रित करण्यासाठी पोलीस आणि पालिकेला याचा मोठा आधार मिळेल.

Web Title : उल्हासनगर को फेडरल बैंक का समर्थन, 16 ट्रैफिक बैरिकेड्स दान

Web Summary : फेडरल बैंक ने उल्हासनगर महानगरपालिका को यातायात प्रबंधन के लिए 16 लोहे के बैरिकेड्स दान किए। महापौर अश्विनी निकम ने आयुक्त मनीषा आव्हाले के साथ दान का उद्घाटन किया। यह पहल शहर के सौंदर्यीकरण प्रयासों का समर्थन करती है।

Web Title : Federal Bank responds to Ulhasnagar, donates 16 traffic barricades.

Web Summary : Federal Bank donated 16 iron barricades to Ulhasnagar Municipal Corporation for better traffic management. Mayor Ashwini Nikam inaugurated the donation alongside municipal commissioner Manisha Awhale. The initiative supports the city's beautification efforts.