शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

दहावीच्या तीन विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात; शाळा आणि पालकांमध्ये फीवरून वाद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 2:09 AM

मोहनपूरम परिसरात ही शाळा असून १५ पालकांनी २०१४ मध्ये आपल्या पाल्याला शासनाच्या आरटीईअंतर्गत अर्ज केले होते.

अंबरनाथ : अंबरनाथ येथील गुरुकुल ग्रॅण्ड युनियन स्कूलमधील तीन विद्यार्थ्यांचे दहावीचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) केलेले अर्ज फेटाळले गेल्याने १५ पालकांचा शाळा व्यवस्थापनासोबत फीवरून वाद विकोपाला गेला आहे. शाळेने योग्य प्रस्ताव न भरल्यामुळेच हे प्रस्ताव फेटाळले गेल्याचा आरोप करत या पालकांनी शाळा व्यवस्थापनाला जबाबदार धरले आहे. मात्र, प्रस्ताव फेटाळण्यात आल्याने शाळेने फी भरण्यासाठी पाठपुरावा केल्याने हा वाद निर्माण झाला आहे. १० डिसेंबर ही परीक्षेचा अर्ज भरण्याची अंतिम तारीख असून शाळेच्या दाखल्याशिवाय अर्ज भरता येत नसल्याने या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष पणाला लागले आहे. यावरून पालकांनी आक्रमक होत व्यवस्थापनाविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे.

मोहनपूरम परिसरात ही शाळा असून १५ पालकांनी २०१४ मध्ये आपल्या पाल्याला शासनाच्या आरटीईअंतर्गत अर्ज केले होते. या अर्जानुसार शाळेने शासनाकडे संबंधित पालकांचा प्रस्ताव पाठवणे अपेक्षित होते. त्यानुसार, प्रस्ताव दाखल झाला. या प्रस्तावाला शासनाकडून २०१७ मध्ये उत्तर आले. तोपर्यंत या विद्यार्थ्यांच्या पालकांना वाटले, ही आपल्या पाल्याचे शिक्षण हे आरटीईअंतर्गत होणार आहे. त्यामुळे ते निश्चिंत होते. २०१७ मध्ये या विद्यार्थ्यांचे प्रस्ताव फेटाळल्याचे लक्षात आल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना पालकांना शाळेची फी भरण्यासाठी शाळेने नोटीस बजावली. शाळेकडून सातत्याने नोटीस बजावण्यात येत असताना दुसरीकडे पालक शासनाकडे आरटीईसंदर्भात शाळेने पुन्हा पाठपुरावा करण्याची अपेक्षा केली होती. त्यावर कोणताच तोडगा निघाला नाही.

१५ विद्यार्थी हे विविध वर्गांत शिकत आहेत; मात्र त्यातील तीन विद्यार्थ्यांना शाळेने नापास झाल्याचे कळवल्याने त्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी या विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेला बसण्यासाठी १७ नंबरचा अर्ज करण्याचे निश्चित केले. मात्र, दहावीची परीक्षा बाहेरून देण्यासाठी त्या विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला मिळणे गरजेचे होते. हा दाखला घेण्यासाठी जाणाऱ्या पालकांना शाळा प्रशासनजुमानत नसल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी पालकांनी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता. पाटील यांनी शाळा प्रशासनाची भेट घेऊन किमान तीन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करण्याची मागणी केली. यासंदर्भात गेल्या आठवडाभर चर्चा सुरू होती. याबाबत शाळा प्रशासन सुरुवातीला सकारात्मक प्रतिसाद देत होती; मात्र शेवटच्या क्षणी शाळा प्रशासनाने फीसंदर्भात कोणतीही तडजोड न करण्याचा निर्णय घेतल्याने तीन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याच्या मार्गावर आहे. १० डिसेंबरला सायंकाळी ५ वाजेपर्यंतच दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत आहे.

शाळेचा दाखला फी भरल्याशिवाय मिळणार नसल्याने या तिन्ही विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात सापडले आहे. या विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थ्यांच्या पालकांची आर्थिक परिस्थिती खराब असल्याने त्यांना ८० ते ९० हजार रुपये थकीत फी भरणे अवघड आहे. त्यामुळे या पालकांसमोर पाल्याचे शिक्षण अर्धवट ठेवण्याची वेळ येणार आहे. केवळ पैशांअभावी विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असल्याने संताप व्यक्त होत आहे.

...तर आमच्यापुढे आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही!

आपली आर्थिक परिस्थिती नसल्यानेच आपण शाळेकडे आरटीईअंतर्गत अर्ज केले होते. मात्र, शाळेने तो प्रस्ताव पाठवताना त्यात अनेक त्रुटी ठेवल्या. तसेच जन्मदाखल्याचाही घोळ घातला होता. त्यामुळे शासनाने तो प्रस्ताव फेटाळला होता. शाळेच्या चुकीचा भुर्दंड आम्हाला भरावा लागत आहे. ८८ हजार रुपये फी भरणे हे आम्हाला शक्य नाही.

घरकाम करणारी बाई एवढी मोठी रक्कम आणणार कोठून, याचा विचार शाळा प्रशासनानाने करायला हवा होता, असे पालक मनीषा शिंदे यांनी सांगितले. शाळेकडे पाठपुरावा करण्यासाठी गेल्यावर शाळेने दोन वेळा आपल्याविरोधात पोलिसांत अदखलपात्र गुन्हे दाखल केले आहेत. शाळेच्या या दादागिरीला आपण वैतागलो असून मुलांचे शिक्षण थांबणार असेल, तर आत्महत्येशिवाय पर्याय राहिलेला नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

विद्यार्थ्यांच्या पालकांना त्यांच्या विद्यार्थ्यांचे आरटीईमध्ये प्रवेश झालेले नाही, याची कल्पना दिलेली होती. त्यानंतर, त्यांना फी भरण्यासंदर्भात सातत्याने पत्र पाठवण्यात आले आहे. त्यांनी त्या पत्रांकडे दुर्लक्ष केले आहे. फी भरलेली नसतानाही त्यांच्या विद्यार्थ्यांचे नववीपर्यंतचे शिक्षण थांबवण्यात आलेले नाही. त्यांनी फी भरली तर लागलीच त्यांचे शाळेचे दाखले देण्यात येतील. पालकांच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असेल, तर त्याला शाळा नव्हे, तर त्यांचे पालक जबाबदार आहेत.- मंजूषा शिंदे, अध्यक्ष, गुरुकुल ग्रॅण्ड युनियन स्कूल

शाळेसोबत चर्चा करण्याची भूमिका आमची होती. शाळा प्रशासनाला वेळही दिला होता. तडजोडीचा मार्ग काढण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र, शाळा प्रशासनाने केवळ वेळकाढूपणा केला आहे. त्यांना विद्यार्थ्यांसंदर्भात सहानुभूती नसल्याचे दिसत आहे. शाळेला फीमध्ये सूट देऊन काही रक्कम आपण स्वत: भरणार आहोत, याची कल्पना देऊनही शाळेने आपली ताठर भूमिका सैल केली नाही.- प्रदीप पाटील, ब्लॉक अध्यक्ष, काँग्रेस

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळा