उल्हासनगरात गरब्यातील वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला

By सदानंद नाईक | Updated: October 25, 2023 16:49 IST2023-10-25T16:48:53+5:302023-10-25T16:49:30+5:30

उल्हासनगर कॅम्प नं-२, झुलेलाल मंदिर जवळच्या दांडिया गरब्याच्या कार्यक्रमात सुमित जयदेव रायवानी या तरुणाचे सोमवारी रात्री १० वाजता धीरज उर्फ गोलू यांच्या सोबत किरकोळ भांडण झाले होते.

Fatal attack on young man due to domestic dispute in Ulhasnagar | उल्हासनगरात गरब्यातील वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला

उल्हासनगरात गरब्यातील वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला

उल्हासनगर : कॅम्प नं-२, झुलेलाल मंदिर शेजारील दांडिया गरब्याच्या कार्यक्रमात क्षुल्लक कारणावरून सोमवारी रात्री ११ वाजता एका टोळक्याने, सुमित जयदेव रायवानी या तरुणावर जीवघेणा हल्ला केला. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात ५ जणांच्या टोळक्यावर गुन्हा दाखल झाला असून सुमित रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे. 

उल्हासनगर कॅम्प नं-२, झुलेलाल मंदिर जवळच्या दांडिया गरब्याच्या कार्यक्रमात सुमित जयदेव रायवानी या तरुणाचे सोमवारी रात्री १० वाजता धीरज उर्फ गोलू यांच्या सोबत किरकोळ भांडण झाले होते. या भांडणाचा राग येऊन धीरज उर्फ गोलू याने काली सरदार, दिनेश प्रेमलानी, रुद्रा पांडे, दिनेश गुरुदानी या मित्रांना बोलावून घेतले. त्यांनी संगनमत करून रात्री ११ वाजता बांबू, धारदार शस्त्र, हातातील कडे यांनी मारहाण करून उजव्या छातीवर चाकूने वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सुमित रायवानी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी ५ जणांच्या टोळक्यावर गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस करीत आहे.

Web Title: Fatal attack on young man due to domestic dispute in Ulhasnagar