Farmers in the Black Valley get murbad tahsildar for flood-affected Panchanam | बाधीत शेती-पीक पंचनाम्यांसाठी काळूच्या खोऱ्यातील शेतकऱ्यांचे मुरबाड तहसीलदारास साकडे

गावपाड्यांसह वाड्यांमधील शेकडो शेतकऱ्यांच्या शेत जमिनीसह भातपीक नुकसानीची जाणीव तहसीलदारांना   करून दिली

ठळक मुद्देमहसूल यंत्रणेच्या पंचनामा पथकांस विलंबशेतकऱ्यांना अतिवृष्टी व पूरस्थितीचा सर्वाधीक फटकाशेत जमिनीसह भातपीक नुकसानीची जाणीव तहसीलदारांना करून दिली

ठाणे : अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. या खरीप पिकांसह शेत जमिनीच्या नुकसानीचे पंचनामे आजपर्यंत बहुतांशी शेतकऱ्यांचे झाले नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. महसूल यंत्रणेच्या पंचनामा पथकांस विलंब झाल्यामुळे मुरबाड तालुक्यातील काळू नदी परिसरातील शेतकऱ्यांनी त्वरीत पंचनामे करण्यासाठी तहसीलदार अमोल कदम यांना लेखी निवेदनाव्दारे साकडे घातले आहे.
         ‘अतिवृष्टीतील सात हजार हेक्टर पिकांचे पंचनामे अर्धवट’ या मथळ्याखालाी लोकमतने २१ आॅगस्ट रोजी वृत्तप्रसिध्द करून शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा हा विषय उघड केला . पंचनामे होऊन नुकसान भरपाईसाठी पात्र ठरणारे शेतकरी शासनाच्या लाभापासून विंचत आहे. तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जात असल्याचे शासनाकडून सांगितले जात आहे. पण बहुतांशी शेतांवर पंचनामा पथक अद्यापही पोहोचलेले नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. यावर मात करण्यासाठी काही शेतकरी स्वत:च तलाठी, सर्कल व तहसीलदार या महसूल यंत्रणांकडे फेऱ्यां  मारून मारीत आहेत. तर काही स्वत: लेखी निवेदन घेऊन तहसीलदारांना साकडे घालत असल्याचे वास्तव जिल्ह्यात दिसून येत आहे.
        मुरबाड तालुक्यात १२ गांवांमधील ३५८ शेतकऱ्यांच्या ७५.३६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे पंचनामे झाल्याचे काही दिवसांपूर्वीच स्पष्ट करण्यात आले. उर्वरित १८ गावांच्या २९२ शेतकºयांच्या २८.५० हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे अर्धवट झाल्याचे निदर्शना आले. यातील संतापलेल्या काळ परिसरातील शेतकऱ्यांनी तहसीलदार कदम यांना लेखी निवेदनाव्दारे साकडे घालून पंचनाम त्वरीत करण्याची मागणी लावून धरली. काळू धरण प्रकल्प विरोधी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शुक्रवारी लेखी निवेदन देत प्रशासनाच पंचनामे त्वरीत करण्याची जाणीव करून दिली आहे.काळूनदी परिसरातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी व पूरस्थितीचा सर्वाधीक फटका खरीप पिकांसह फळबागांना देखील मोठ्या प्रमाणात बसला आहे.
       मुरबाड तालुक्यातील या काळू नदी परिसरातील ३० ते ४० हेक्टर भातपिकांसह २५० हेक्टर शेत जमीन बाधीत झाल्याचा आंदाज शेतकऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. सुमारे २६० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यांचे त्वरीत पंचमाने करण्याच्या मागणीसाठी काळू धरण विरोधी संघर्ष समितीचे पोपटराव देशमुख, रामचंद्र देशमुख आणि रंगनाथ देशमुख यांनी तहसीलदारांना साकडे घातले. यावेळी त्यांनी शेती नुकसान व पूरग्रस्त तळेगाव, खरशेत-उमरोली, जडई ,फांगळोशी,दिघेफळ, आंबिवली, चासोळे, खुटल (बा.), न्याहाडी, फांगणे,भोरांडे, उदाळडोह या महसूली गांवासह कुंडाचीवाडी,भट्टीचीवाडी,भिकारवाडी, शिरसोनवाडी आणि वाकळवाडी आदी गावपाड्यांसह वाड्यांमधील शेकडो शेतकऱ्यांच्या शेत जमिनीसह भातपीक नुकसानीची जाणीव तहसीलदारांना   करून दिली आहे.
..

Web Title: Farmers in the Black Valley get murbad tahsildar for flood-affected Panchanam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.