शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

कारशेडच्या भूखंडावर फार्म हाऊस

By admin | Updated: February 24, 2016 03:07 IST

येत्या चार वर्षांत मेट्रो रेल्वे पूर्ण करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर या प्रकल्पाचे अतिरिक्त आयुक्त संजय सेठी यांनी प्रस्तावित कारशेडच्या जागेस भेट दिली.

ठाणे : येत्या चार वर्षांत मेट्रो रेल्वे पूर्ण करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर या प्रकल्पाचे अतिरिक्त आयुक्त संजय सेठी यांनी प्रस्तावित कारशेडच्या जागेस भेट दिली. कारशेडकरिता २०० एकर जमिनीची आवश्यकता असून सध्या त्यापैकी बहुतांश जमीन मोकळी असतानाच जमीन संपादन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश असल्याचे सेठी यांनी सांगितले. मात्र सध्या या जमीन संपादनाला स्थानिक शेतकरी व आदिवासी यांनी विरोध केला आहे.कारशेडच्या पाच ते सात टक्के जमिनीवर १२ ते १५ बंगले, फार्म हाऊस उभे आहेत. याखेरीज काही किरकोळ घरे आहेत. आदिवासी व शेतकरी यांच्या मालकीची ही जमीन आहे. शिवाय काही बांधकाम व्यावसायिकांनी स्थानिकांसोबत जमीन खरेदीचे करार-मदार केल्याची चर्चा आहे. या सर्वांना पुरेसा मोबदला देऊनच जमीन संपादन झाले पाहिजे, अशी मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी सेठी यांच्याकडे केली. नाट्यसंमेलनानिमित्त येथे आलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांना सरनाईक यांनी मेट्रोची प्रतिकृती दिली होती. याच विषयावर किमान डझनभर लक्षवेधी सरनाईक यांनी विधानसभेत मांडल्या आहेत. त्याची दखल घेत फडणवीस यांनी सेठी यांना तात्काळ येथे धाडले. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, सरनाईक आणि नगरसेवक संभाजी पंडित यांनी कासारवडवली व ओवळा येथील या जागेची पाहणी केली. (प्रतिनिधी)निवडणुकीवर डोळामेट्रो प्रकल्प चार वर्षांत पूर्ण होणे अशक्य आहे. मात्र त्याचा श्रीगणेशा पुढील वर्षींपूर्वी व्हावा, असा शिवसेना व भाजपाचा आग्रह आहे. पुढील वर्षीच्या प्रारंभी महापालिका निवडणुका असून तत्पूर्वी जमीन संपादन काही अंशी झाले असले तरी त्या भरवशावर महापालिका निवडणूक जिंकण्यास हातभार लागेल, असे दोन्ही पक्षांना वाटते.