अवघ्या १० रुपयांच्या वादातून रिक्षाचालकावर जीवघेणा हल्ला; आरोपींना बेड्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2018 16:19 IST2018-07-05T16:17:59+5:302018-07-05T16:19:29+5:30

जखमी रिक्षाचालक एमजीएम रुग्णालयात आयसीयूत दाखल

Failure of only 10 rupees, a suicide bomber on a rickshaw puller; Chained to the accused | अवघ्या १० रुपयांच्या वादातून रिक्षाचालकावर जीवघेणा हल्ला; आरोपींना बेड्या 

अवघ्या १० रुपयांच्या वादातून रिक्षाचालकावर जीवघेणा हल्ला; आरोपींना बेड्या 

पनवेल - केवळ  दहा रुपयांच्या वादातून पनवेल रेल्वे स्थानकाजवळ एका रिक्षाचालकाला भोसकण्यात आले आहे. त्यामुळे पनवेल रेल्वे स्थानकाबाहेरील रिक्षाचालकांमध्ये एकच दहशत निर्माण झाली आहे. पोलिसांनी या रिक्षाचालकावर हल्ला करणाऱ्या तीन जणांना अटक केली आहे. या तिघांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यात रिक्षाचालक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी एमजीएम रुग्णालयातील आयसीयूत दाखल करण्यात आलं आहे.

रविवारी अक्षय शिंदे याने त्याच्या करंजाडे तेथे घरी जाण्यासाठी पनवेल रेल्वे स्थानकाजवळून शेख याची रिक्षा केली. शेख याने अक्षयला ६० रूपये भाडं होईल, असं सांगितलं होतं. अक्षयने ते मान्य करत शेखच्या रिक्षातून प्रवास सुरु केला. मात्र, घराजवळ उतरताच अक्षयने आपल्याकडे फक्त ५० रुपये असल्याचं सांगितलं. यावरून शेख याने अक्षयशी वाद निर्माण केला. या वादाचे पर्यवसन हाणामारीत झाले. यानंतर शेख तिथून निघून गेला. अक्षयने शेखला अद्दल घडविण्यासाठी दोन मित्रांना बोलावले आणि पुन्हा पनवेल रेल्वे स्टेशन गाठले. या तिघांनी मिळून शेखला शोधून काढलं आणि त्याच्यावर चाकूने जीवघेणा  हल्ला केला. शेखला रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहताच अक्षय आणि त्याचे मित्रांनी तेथून पळ काढला. इतर रिक्षाचालकांनी गंभीर जखमी झालेल्या शेखला रुग्णालयात दाखल केलं असून त्याच्यावर सध्या आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.

 


 

Web Title: Failure of only 10 rupees, a suicide bomber on a rickshaw puller; Chained to the accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.