शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

जहाल नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडेचा सहा राज्यांमधील नक्षली कारवायांमध्ये सक्रिय सहभाग

By जितेंद्र कालेकर | Published: November 14, 2021 9:35 PM

माओवादी संघटनेच्या सेंट्रल झोन कमिटीचा सदस्य जिवा उर्फ दीपक उर्फ मिलिंद तेलतुंबडे (रा. राजूर, यवतमाळ) याचा तसेच त्याची अंगरक्षक विमला उर्फ ईमला उर्फ कमला उर्फ मान्सो सुखराम बोगा (रा. गजामेंढी, गडचिरोली) यांच्यासह २६ नक्षलवाद्यांचा शनिवारी गडचिरोली पोलिसांनी खात्मा केला. त्यांच्यापैकी १४ नक्षलींवर एक कोटी ३८ लाखांचे बक्षीस राज्य शासनाने यापूर्वीच जाहीर केले होते.

ठळक मुद्देएकनाथ शिंदे यांची माहिती १४ नक्षलींवर होते एक कोटी ३८ लाखांचे बक्षीस

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : जहाल नक्षलवादी तथा एमएमसी प्रमुख आणि माओवादी संघटनेच्या सेंट्रल झोन कमिटीचा सदस्य जिवा उर्फ दीपक उर्फ मिलिंद तेलतुंबडे (रा. राजूर, यवतमाळ) याचा तसेच त्याची अंगरक्षक विमला उर्फ ईमला उर्फ कमला उर्फ मान्सो सुखराम बोगा (रा. गजामेंढी, गडचिरोली) यांच्यासह २६ नक्षलवाद्यांचा शनिवारी गडचिरोली पोलिसांनी खात्मा केला. त्यांच्यापैकी १४ नक्षलींवर एक कोटी ३८ लाखांचे बक्षीस राज्य शासनाने यापूर्वीच जाहीर केले होते. मिलिंदचा सहा राज्यांमधील नक्षली कारवायांमध्ये सक्रिय सहभाग असल्याची माहिती गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी ठाण्यात दिली.गडचिरोली पोलिसांनी जिवाची बाजी लावून गस्तीदरम्यान पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या नक्षलींवर हल्ला केला. यात मिलिंदसह २० पुरुष आणि सहा महिला नक्षलवाद्यांचा खात्मा झाला आहे. या जहाल नक्षलींचा छत्तीसगढ आणि आंध्र प्रदेशचे पोलीसही शोध घेत होते. २६ पैकी १६ नक्षलींची ओळख पटली असून, दहा अनोळखींची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. यामध्ये सेंट्रल कमिटी मेंबर (सीसीएम) जिवी उर्फ मिलिंद तेलतुंबडे याच्यावर ५० लाखांपेक्षा अधिक तर त्याची अंगरक्षक विमला हिच्यावर चार लाखांचे बक्षीस होते. उर्वरित बंडू उर्फ दलसू गोटा, प्रमोद उर्फ दलपत कचलामी आणि कोसा उर्फ मुसाखी या कंपनी चारमधील पीपीसीएम पदावरील नक्षलींवर चार लाखांचे, तर मिलिंदचा अन्य एक अंगरक्षक एसीएम भगतसिंग उर्फ प्रदीप जाडे याच्यावर सहा लाखांचे बक्षीस होते. याशिवाय, छत्तीसगढच्या टिपागढ दलममध्ये अलीकडेच भरती झालेला चेतन याच्यावर दोन लाख रुपये, छत्तीसगढच्याच कोरची दलमचा कमांडर किशन उर्फ जैमन आणि कसनसूर दलमचा कमांडर सत्रू उर्फ कोवाची या दोघांवर प्रत्येकी आठ लाखांचे बक्षीस होते. गडचिरोलीच्या कसनसूर दलमचा डीव्हीसीएम महेश उर्फ शिवाजी गोटा याच्यावर १६ लाख, तर प्रकाश उर्फ साधू सोनू बोगा, लच्छू (छत्तीसगढ) आणि नवलूराम उर्फ दिलीप तुलावी या कंपनी क्रमांक चारच्या पीएम यांच्यावरही प्रत्येकी चार लाखांचे बक्षीस होते. याशिवाय, लोकेश उर्फ मंगू पोडयाम (रा. दंतेवाडा, छत्तीसगढ) या कंपनी चारच्या कमांडरवरही राज्य शासनाने २० लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.* चकमकीत खात्मा झालेल्यांमध्ये एक सीसीएम, दोन डीव्हीसीएम, दोन कमांडर, एक एसीएम, चार पीपीसीएम यांचा समावेश आहे. सामान्य नागरिकांमध्ये या नक्षलींमुळे भीतीचे वातावरण होते. ही स्थिती आता पूर्ववत होत असल्याचा दावा शिंदे यांनी यावेळी केला.* धमकीचा तपास सुरूआपल्याला यापूर्वीही नक्षलींकडून अनेकवेळा धमक्या आल्या होत्या. अलीकडे धमकीचे पत्र देणाऱ्याचा तपास पोलीस आणि गृहविभागाकडून सुरू आहे. अशा धमक्यांना आपण भीक घालत नसल्याचेही शिंदे म्हणाले. काही नक्षली स्वत:हून विकासाच्या ठिकाणी येत आहे. त्यामुळे बदल होत असल्याचेही ते म्हणाले. नक्षलींच्या आत्मसमर्पणासाठी राज्य सरकारने चांगल्या योजना सुरू केल्या आहेत, त्याचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीGadchiroliगडचिरोली