गॅलेक्सी सरफॅक्टटंट कंपनीत स्फोट; दोन कामगारांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 14:13 IST2020-04-13T14:13:29+5:302020-04-13T14:13:51+5:30

तारापूर एमआयडीसी अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी पोहोचले असून गंभीर जखमी व संभाव्य मृतांना रुग्णालयात नेण्यात आले आहे.

Explosion in Galaxy Surfactant Company; two workers dead hrb | गॅलेक्सी सरफॅक्टटंट कंपनीत स्फोट; दोन कामगारांचा मृत्यू

गॅलेक्सी सरफॅक्टटंट कंपनीत स्फोट; दोन कामगारांचा मृत्यू

पालघर : -तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील प्लॉट नंबर m3 मधील गॅलेक्सी सरफॅक्टटंट कंपनीत भीषण स्फोट झाला. यामध्ये दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे.
तारापूर औद्योगिक वसाहतीमधील गॅलेक्सी सरफॅक्टटंट या कंपनीमध्ये आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास भीषण स्फोट झाला. यामध्ये विजय सावंत,
समीर( पालघर)हे दोन कामगरांचा जागिच मृत्यु झाला.तर रुणाल ठाकुर(पास्थल,बोईसर)हा गंभीर जखमी झाला आहे.


   तारापूर औद्योगिक वसाहतीमधील प्लॉट एम-३ मध्ये गॅलेक्सी सरफॅक्टटंट ही कंपनी आहे. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास इथे भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, सध्या लॉकडाउनमुळे कंपनीच्या बाजूच्या बहुतांश कंपन्या बंद असल्याने या स्फोटाचा आवाज सुमारे पाच किमीवर असलेल्या नांदगाव व मुरबे गावांपर्यंत ऐकू आला.

तारापूर एमआयडीसी अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी पोहोचले असून गंभीर जखमी व संभाव्य मृतांना रुग्णालयात नेण्यात आले आहे.

Web Title: Explosion in Galaxy Surfactant Company; two workers dead hrb