शहरं
Join us  
Trending Stories
1
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
2
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
6
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
7
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
8
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
9
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
10
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
12
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
13
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
14
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
15
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
16
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
17
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

एटीएसच्या कारवाईतील एक अतिरेकी पालिकेचा कर्मचारी असल्याचे उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 5:14 AM

एटीएसने अटक केलेल्या अतिरेक्यांपैकी जमान खुटेउपाड (३२) हा पालिकेचा कर्मचारी आहे.

 - जितेंद्र कालेकर ठाणे : एटीएसने अटक केलेल्या अतिरेक्यांपैकी जमान खुटेउपाड (३२) हा पालिकेचा कर्मचारी आहे. त्यामुळे त्याच्यासोबत आणखी काही जणांचा सहभाग आहे का? या दिशेने अधिक तपास सुरू आहे. जमानच्या मदतीने मुंबईतील पाणीसाठ्यातूनही रासायनिक हल्ल्याचा कट होता का? या दिशेनेही एटीएस अधिक तपास करत आहेत.लोहारा गावात जमानचे आई-वडील, मामा, तसेच इतर नातेवाईक वास्तव्याला आहेत. त्याचे सर्व शिक्षणही तिथेच झाले. लहानपणापासून तो हुशार असल्यामुळे त्याला चांगले गुण मिळायचे. याच जोरावर त्याने डी. फार्मसीही पूर्ण केले. चांगल्या शिक्षणामुळे मुंबईत भायखळा येथे पालिकेच्या रुग्णालयात औषधनिर्माता म्हणून त्याला नोकरीही लागली. एकमार्गी राहणाऱ्या या कुटुंबात जमानचे वर्तन अतिशय चांगले असल्यामुळे, तसेच त्याचा थेट ‘इसिस’शी संबंध जोडला गेल्यामुळे, आता त्याच्या संपूर्ण कुटुंबाला धक्का बसल्याचे त्याचे मामा हसाक यांनी सांगितले. आईवडिलांनाही मानसिक धक्का बसला आहे. त्यामुळे गावी मिस्त्रीचे काम करणारे नबी (वडील) सारखे भावनाविवश होत आहेत. यात त्यांना सारख्या उलट्या आणि चक्करचा त्रास सुरू झाला आहे.जमान हा पत्नी तय्यबासह ठाण्याच्या कौसा, अमृतनगर येथील ‘फझील अपार्टमेंट’मध्ये सातव्या मजल्यावर ७०५ क्रमांकाच्या खोलीमध्ये गेल्या काही दिवसांपासून वास्तव्याला आहे. घरातही त्याचे वर्तन अगदी साधे होते. नोकरीनिमित्त कामावर जाणे आणि परत घरी परतणे. त्यामुळे पत्नीलाही काहीच माहीत नसल्याचा तिचा दावा आहे. त्याचे नातेवाइकांशी अधूनमधून बोलणे होत होते. गावी मात्र, ईदसारख्या सणानिमित्तच वर्षभरातून दोन ते तीन वेळा त्याचे येणे होते, असे त्याचे भाऊ अन्वर यांनी सांगितले. त्याचा वर्गमित्र अ‍ॅड. पी. व्ही. घोडके यांनीही मित्रासाठी मुंबईत धाव घेतली आहे. सर्व काही सुरळीत असताना हे असे कसे घडले? या कुटुंबाने कधी पोलीस ठाण्याची पायरीही चढली नाही. इतकी घरातील मंडळी चांगली आहेत.गेल्या महिनाभरात त्याच्याशी अगदी त्रोटक बोलणे झाल्याचे अ‍ॅड. घोडके म्हणाले. जमानवर नेमके कोणते आरोप लावले आहेत, याची माहिती अद्याप पोलिसांनी दिली नसल्याचेही त्यांनी सांगितले. जमानसह इतरही संशयितांच्या नातेवाइकांना ‘एटीएस’च्या मुंबई कार्यालयात बुधवारी बोलावण्यात आले होते. तिथे या नातेवाइकांची संपूर्ण माहिती घेतली असून, त्यांना या सर्व ‘इसिस’ संशयित आरोपींवरील आरोपांची माहिती देण्यात येत असल्याचे एका अधिकाºयाने सांगितले. सर्व आरोपींना औरंगाबाद न्यायालयात हजर करण्यासाठी नेण्यात आल्याचेही या अधिकाºयाने सांगितले.>इसिसचे मुंब्रा कनेक्शन...मुंब्रा येथून यापूर्वीही अटक केलेले अतिरेकी आणि अन्य आरोपींचा दोन वर्षांपूर्वी मुंबई एटीएसच्या पथकाने मुंब्रा भागातून मुदब्बीर शेख या इसिसच्या भारताच्या कमांडरला अटक केली होती. कट्टर धार्मिक असलेल्या मुदब्बीरकडूनही अनेक आक्षेपार्ह सामुग्री हस्तगत केली होती. इंटरनेटच्या माध्यमातून भारतातील अनेक तरुणांना इसिससाठी प्रेरित करून त्यांना इसिसच्या जाळयात ओढण्याचे काम तो करीत होता. मुदब्बीर पाठोपाठ निझाम शेखलाही अटक केली होती. सध्या मुंब्रा येथून अटक केलेल्या अतिरेकीही त्यांच्याच जवळपास राहणारे आहेत. त्यामुळे तेही त्यांच्या संपर्कात असल्याचा संशय एटीएसला आहे. त्यादिशेनेही अधिक तपास सुरू आहे.