शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
2
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
3
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
4
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
5
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
6
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
7
७० वर्षांच्या आजारी आजीला पाठीवरुन घेऊन जाणारा नातू सोशल मीडियावर बनला हिरो
8
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
9
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
10
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
11
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
12
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
13
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
14
अकोला हादरले! शासकीय रुग्णालयातच एकाची दगडाने ठेचून हत्या, शाब्दिक वादातून मित्रानेच घेतला जीव
15
NEET च्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर
16
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
17
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
18
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
19
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
20
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान

सर्वसामान्यांनी खबरदारी घेतली...आता तुम्ही जबाबदारी घ्या! : मनसेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 16:24 IST

सर्वसामान्यांनी खबरदारी घेतली...आता तुम्ही जबाबदारी घ्या! - महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील पात्र परंतु लाभ न मिळालेल्या रूग्णांच्या बिलाची रक्कम परत द्या - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणीबाबत ठाणे जिल्हाधिकार्‍यांसोबत सकारात्मक चर्चा

ठळक मुद्देसर्वसामान्यांनी खबरदारी घेतली...आता तुम्ही जबाबदारी घ्या! - मनसे महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील पात्र परंतु लाभ न मिळालेल्या रूग्णांच्या बिलाची रक्कम परत द्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणीबाबत ठाणे जिल्हाधिकार्‍यांसोबत सकारात्मक चर्चा

ठाणे : कोरोना काळात मुख्यमंञी राज्यातील जनतेला 'तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो' असे निक्षून सांगत होते. माञ तरीही हजारो सर्वसामान्य गरीब रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळाला नसून त्यांनी खाजगी रुग्णालयाची बिलं स्वत:च्या खिशातून भरलेली आहेत. या रुग्णांच्या बिलाची रक्कम योजनेच्या नियमानुसार धनादेशाद्वारे त्यांना परत मिळवून देण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज ठाणे जिल्हाधिकार्‍यांकडे केली. याबाबत मनसेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा केली असून या मागणीचा सकारात्मक विचार होईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला देण्यात आले आहे. 

ठाणे शहरातील महात्मा फुले योजनेतंर्गत येत असलेल्या रुग्णालयातील बेडची यादी जाहीर करण्याची मागणी मनसेसह बाकीच्या पक्षातील लोकप्रतिनिधींनी केली. माञ प्रशासन त्याला दाद देत नसून या लालफिती कारभारात गोरगरीब रुग्णांच्या खिशाला अव्वाच्या सव्वा बिलामार्फत काञी बसत आहे. त्यामुळे विमा कंपन्यांच्या कॅशलेस मेडिक्लेम योजनेत कंपनीला बिल सादर केल्यानंतर सर्व रुग्णांना रुग्णालयात भरलेल्या पैशांचा परतावा मिळतो. अगदी त्याच धर्तीवर महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील पात्र परंतु लाभ न मिळालेल्या रूग्णांच्या बिलाची रक्कम परत करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे केली. याबाबत संदीप पाचंगे यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदनच सादर केले असून या योजनेतील ञुटी दूर करुन गोरगरीब रुग्णांना प्रशासनाने आधार देण्याची मागणी पाचंगे यांनी केली. या प्रकरणी जिल्हाधिकारी नार्वेकर यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत या मागणीचा विचार करुन त्याची लवकरच अमंलबजावणी करण्यासाठी पावलं उचलली जातील, असे मनसेच्या शिष्टमंडळाला सांगितले. यावेळी मनविसेचे शहराध्यक्ष किरण पाटील उपस्थित होते.---------------------------------------------------------------किती रुग्णांची बिलं माफ केली जाहीर कराखासगी रुग्णालयांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनेतंर्गत किती रुग्णांची बिलं माफ केली. या  संर्दभात यादी जाहीर करावी. दर्शनी भागात या योजनेतील अारक्षित बेडची यादी, मदतीसाठी संपर्क क्रमांक रुग्णालयाने जाहीर करावा. तरच गोरगरिब रुग्णांची कोरोनाकाळातील वणवण थांबणार आहे.- संदीप पाचंगे, जिल्हाध्यक्ष, मनविसे.  विभाग अध्यक्ष (ओवळा माजीवडा विधानसभा)

टॅग्स :thaneठाणेMNSमनसेPoliticsराजकारण