शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

अखेर ‘त्या’ ताेतया पोलिसांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:30 IST

सचिन लहानू भालेराव (४९) हे उल्हासनगर- ४ येथील सुभाष टेकडी परिसरात राहत असून एका खासगी कंपनीत काम करतात. २५ ...

सचिन लहानू भालेराव (४९) हे उल्हासनगर- ४ येथील सुभाष टेकडी परिसरात राहत असून एका खासगी कंपनीत काम करतात. २५ मे रोजी सायंकाळी ६.१० वाजता ते अंबरनाथ रेल्वेस्थानकावर उतरून कानसई रस्त्याने घरी जात होते. तेव्हा दोन अनाेळखी इसम मोटारसायकलवरून आले आणि त्यांनी सचिन यांना थांबविले. सचिन यांनी ताेंडावरचा मास्क काढल्याने, तू सरकारी नियम मोडले असून तुझ्यावर पोलीस कारवाई करावी लागेल अशी दमदाटी केली. त्यानंतर त्यांच्या बोटात असलेली २० हजार रुपयांची सोन्याची अंगठी जबरदस्तीने काढून घेतली. त्यानंतर ते फरार झाले होते. याप्रकरणी सचिन यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दोघांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, रविवारी गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अमलदार पाटील व मुंढे यांना मटका चौकात एक विना नंबरप्लेट असलेली मोटारसायकल दिसली. त्यावर तीन इसम बसले हाेते. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना ऑर्डनन्स इस्टेट रोड येथे थांबवून विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यांना अंबरनाथ पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यांच्या चाैकशीत २५ मे राेजी शिवाजीनगर पाेलीस ठाणे हद्दीत एकाला लुटल्याचे कबूल केले आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली.