राज्य शासनाच्या निर्णयानंतरही कल्याण डोंबिवलीतील 400 हॉटेल, बार रेस्टॉरंट बंदच

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2020 06:53 PM2020-10-05T18:53:44+5:302020-10-05T18:54:21+5:30

Dombivali News : ७ ऐवजी रात्री ११ पर्यन्त वेळ वाढवून हवी, कल्याण, डोंबिवली हॉटेल ओनर्स असोसिएशनची मागणी 

Even after the decision of the state government, 400 hotels and bars and restaurants in Kalyan Dombivali remained closed | राज्य शासनाच्या निर्णयानंतरही कल्याण डोंबिवलीतील 400 हॉटेल, बार रेस्टॉरंट बंदच

राज्य शासनाच्या निर्णयानंतरही कल्याण डोंबिवलीतील 400 हॉटेल, बार रेस्टॉरंट बंदच

Next

- अनिकेत घमंडी
डोंबिवली: सकाळी ९ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत हॉटेल उघडी ठेऊन आम्हाला परवडणारे नाही, आधीच या व्यवसायाचे प्रचंड नुकसान झाले आहे, संध्यकाळाची वेळ रात्री १०.३० पर्यन्त वाढवून द्यावी, अन्यथा व्यवसाय सुरू करून काहीही फायदा नाही. जो पर्यंत वेळ वाढवून मिळत नाही तो पर्यंत हॉटेल बंद ठेवलेली बरी असा पवित्रा कल्याण, डोंबिवलीमधील हॉटेल ओनर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला. त्यामुळे सोमवारपासून हॉटेल व्यवसायिकांनासुद्धा त्यांचे व्यवस्याय कोरोनाचे नियम पाळून सुरू ठेवण्यात यावे असे जाहीर करण्यात आले होते, परंतु वेळेचे समीकरण जुळत नसल्याने हॉटेल बंद ठेवून पार्सल सेवा सुरू ठेवण्यावर व्यावसायिकांनी भर दिला. त्यामुळे या दोन्ही शहरातील सुमारे ४००हुन अधिक हॉटेल, बार, छोटे रेस्टोरंट, स्नॅक्स बार आदी बंद असल्याचे निदर्शनास आले.

ग्राहकांनी उत्सुकतेपोटी विचारणा केली खरी,पण त्यांनाही अजून मागण्या पूर्ण झाल्या नसल्याचे व्याकसायिकांनी सांगितले. त्या असोसिएनशनचे अध्यक्ष अजित शेट्टी(डोंबिवली), प्रवीण शेट्टी(कल्याण) यांनी सांगितले की, मुळात हॉटेल दोन शिफ्ट मध्ये चालतात. त्यात सकाळी ९ ते संध्याकाळी ७ अशा विचित्र वेळेत कोणतीही शिफ्ट पूर्ण होत नाही, त्यामुळे कामगारांना कामावर तरी कसे बोलवावे. तसेच हॉटेल, बार हे व्यवसाय संध्याकाळी ७ नंतर खऱ्या अर्थाने चालू होतात, त्यामुळे ७ नंतर बंद करून व्यवसाय सुरू करण्याला काही अर्थ नाही.

नुकसान अधिच झाले आहे त्यात आणखी भर पडेल. त्यामुळे केडीएसमी आयुक्त डॉ विजय सुर्यवंशी यांची लवकरच भेट घेऊन मुंबईच्या धर्तीवर इथं देखील व्यवसायाची वेळ वाढवून द्यावी अशी मागणी करण्यात येणार आहे. त्याबाबतचे पत्र तयार करण्यात येत आहे, या व्यवसायासमोरच्या अडचणींबाबत देखील त्यात समावेश करण्यात येणार असल्याचे शेट्टी म्हणाले. पण ठोस निर्णय होत नाही तो पर्यंत हॉटेल बंद ठेवण्यात येणार असून आतासारखी पार्सल सेवा सुरू राहील या निर्णयावर व्यावसायिक ठाम असल्याचे ते म्हणाले.

Web Title: Even after the decision of the state government, 400 hotels and bars and restaurants in Kalyan Dombivali remained closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.