शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गंधी घालविण्यासाठी निलगीरी वापरली; सानेच्या चौकशीत नवनवीन खुलासे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2023 06:51 IST

सानेच्या कबुली जबाबातून अनेक नवनवीन खुलासे उघड होत आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्क,  मीरा रोड :मीरा रोडमध्ये सरस्वती वैद्य (३२) चे  तुकडे करणाऱ्या मनोज साने याने त्याच्या नातलगांना सरस्वती ही भाची असल्याचे सांगितले होते. साने याने गुगलवर सर्च करून तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी खरेदी केलेली यांत्रिक करवत बंद पडली असता, ती पुन्हा दुरुस्त करून घेतली होती. तसेच मृतदेहाला दुर्गंधी येऊ नये म्हणून त्याने निलगिरीच्या पाच बाटल्या खरेदी केल्या होत्या, अशाप्रकारे सानेच्या कबुली जबाबातून अनेक नवनवीन खुलासे उघड होत आहेत. 

पोलिसांना घरातून सरस्वतीच्या शरीराचे ३० ते ३५ तुकडे सापडले होते. ते तुकडे जेजे रुग्णालयात जुळवण्याचा प्रयत्न केला असता तिच्या पोटाचा,  डोक्याचा काही भाग सापडलेला नाही. साने याने तुकडे कुकरमध्ये शिजवले व काही भाजल्याने बहुतांश हाडांवर मांस राहिलेले नाही. साने याने एका पिशवीतून मृतदेहाचे काही तुकडे बाहेर टाकले होते. ते चित्र अत्यंत भयावह होते. मात्र, मृतदेहाचे तुकडे जुळविताना  पोलिसांचीही मोठी कसरत होत आहे. सानेने ज्याठिकाणी तुकडे बाहेर टाकले होते त्या ठिकाणचा पोलिस शोध घेणार आहेत.  पोलिस साने याच्या जप्त केलेल्या मोबाइलची तपासणी करत आहेत. जेणेकरून पुढील तपास करणे सोपे होईल. साने हा काही महिलांशीही संपर्कात असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. सरस्वतीच्या व सानेच्या मोबाइलमधून बऱ्याच गोष्टींचा उलगडा होण्याची दाट शक्यता आहे.

उद्या बहिणींच्या स्वाधीन करणार मृतदेहाचे तुकडे 

- पोलिसांनी साने व सरस्वती यांच्या मोबाइल कॉलचे सीडीआर काढण्यास घेतले आहेत, तर साने व सरस्वती भाड्याने राहत असलेल्या गीता नगर फेज ७ मधील गीता आकाशदीप इमारत व परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज तपासत आहेत. 

- साने हा सरस्वतीला त्रास देत होता. त्याबाबत तिने बहिणीलाही सांगितले हाेते. त्यामुळे बहिणींनी तिला त्यांच्या घरी बाेलावले हाेते, असेही त्यांनी सांगितले होते. सरस्वतीची हत्या झाल्याचे बहिणींना बातम्यांतून समजले. 

- सोमवारी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे हे अंत्यसंस्कारासाठी बहिणींच्या स्वाधीन केले जाणार आहेत. स्वतः आणि सरस्वती अनाथ असल्याचे सांगणाऱ्या साने याच्या बोरिवलीतील बाभई येथे राहणाऱ्या नातलगांकडे नया नगर पोलिसांनी चौकशी केली. त्यात साने याने सरस्वती ही भाची असल्याचे त्यांना सांगितल्याचे उघड झाले होते. 

- सरस्वतीला दहावीची परीक्षा द्यायची होती. साने हा तिच्यासोबत आश्रमात जायचा. त्यावेळी साने  हा वयाने बराच मोठा असल्याने साने हा आपला मामा असल्याचे सरस्वतीने सर्वांना सांगितले होते. 

टॅग्स :Mira Road Murderमीरा रोडMira Bhayanderमीरा-भाईंदरCrime Newsगुन्हेगारी