- सदानंद नाईक, उल्हासनगर आर्थिक विवंचनेतून पवन पाहुजा यांनी बुधवारी मध्यरात्री पत्नी व मुलीची धारदार हत्याराने वार करून हत्या केली. त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी आर्थिक विवंचनेतून जीवन संपवत असल्याचा व्हिडीओ रेकॉड केला होता, हेही समोर आले आहे. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
उल्हासनगर कॅम्प नं-१, बेवस चौक येथील एका इमारतीमध्ये पवन पहुजा हे कुटुंबासह राहत होते. सोन्याचे दागिने बनविन्याच्या एका दुकानात ते कामाला होते. त्यांच्या पगारात कसाबसा घर संसाराचा गाडा चालत होता.
मुलाच्या मृत्यूने मानसिक धक्का, नंतर कुटुंब उद्ध्वस्त
काही महिन्यापूर्वी त्यांच्या लहान मुलांचा मृत्यू झाल्याने, त्यांना मानसिक धक्का बसला होता. मुलगी दहावीची परीक्षा चांगल्या गुणाने उत्तीर्ण झाली होती. मात्र आर्थिक विवेचनाला कंटाळून त्यांनी कुटुंबासह जीवन संपविण्याचा निर्णय घेतल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे.
वाचा >>दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
पवन पाहुजा यांनी बुधवारी (१४ मे) मध्यरात्री पत्नी नेहा व मुलगी रोशनी यांची गळा चिरून हत्या केली. त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली.
आत्महत्या करण्यापूर्वी रेकॉर्ड केला व्हिडीओ
आत्महत्या पूर्वी पवन पाहुजा यांने स्वतःच्या मोबाईल मध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करून आर्थिक विवेचनातून जीवन संपवित असल्याचे म्हटलेले आहे.
उल्हासनगर पोलिसांना गुरुवारी याबाबत माहिती मिळाल्यावर, घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी मध्यवर्ती रुग्णालयात हलविण्यात आले.
पवन हा सोनार गल्ली परिसरात एका दुकानात कामाला होता. या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्युंची नोंद करण्यात आली असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले. अधिक तपास उल्हासनगर पोलीस करीत आहेत.