लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर अश्लील फोटोची पोस्ट टाकून एका १७ वर्षीय मुलीचा विनयभंग करणा-या सिद्धेश खोत (२१) या अभियांत्रिकेचे शिक्षण घेणा-या आरोपीला श्रीनगर पोलिसांनी गुरुवारी अटक केली आहे. त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.गेल्या महिनाभरापासून तो पोलिसांना हुलकावणी देत होता. ठाण्याच्या वागळे इस्टेट किसननगर भागात सिद्धेश वास्तव्याला आहे. त्याच परिसरात ही तरुणीही वास्तव्याला आहे. २७ आॅगस्ट ते २५ सप्टेंबर २०१८ या कालावधीत त्याने फेसबुक अणि इन्स्टाग्रामवर या मुलीच्या नावाने बनावट खाते उघडले. ते खाते तिचे असल्याचे भासवून त्यावर तिचा फोटो पोस्ट केला. त्यानंतर स्त्री पुरुषांचे अश्लील फोटोही टाकले. हा प्रकार या मुलीला इतरांकडून समजल्यानंतर तिने याप्रकरणी २५ आॅक्टोबर रोजी श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. हे बनावट खाते उघडून अश्लील पोस्ट टाकणा-याचा शोध लागत नव्हता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुलभा पाटील आणि पोलीस निरीक्षक दिनकर चंदनकर यांनी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या सायबर क्राईम आणि फेसबुकच्या मदतीने सिद्धेशचा शोध घेतला. मित्रांच्या सांगण्यावरुन आपण हा प्रकार केल्याचा दावा त्यानेपोलिसांकडे केला.
फेसबुकवर बनावट खात्याच्या आधारे अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 22:50 IST
आपल्याच घराजवळ राहणा-या तरुणीच्या नावाने बनावट फेसबुक खाते खोलून त्यात तिचे अश्लील फोटो आणि व्हीडीओ पोस्ट करुन तिचा फोटो टाकून विनयभंग करणा-या अभियांत्रिकीच्या सिद्धेश खोत याला श्रीनगर पोलिसांनी गुरुवारी अटक केली आहे.
फेसबुकवर बनावट खात्याच्या आधारे अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यास अटक
ठळक मुद्दे अश्लील फोटो आणि व्हीडीओ केले पोस्टअभियांत्रिकीचा विद्यार्थी असूनही केले कृत्यश्रीनगर पोलिसांची कारवाई