शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
3
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
4
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
6
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
7
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
8
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
9
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
10
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
11
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
12
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
13
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
14
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
15
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
16
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
17
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
18
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
19
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
20
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले

करवाढ न करता उत्पन्नाचे स्रोत वाढवण्यावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 10:33 PM

नागरिकांना दिलासा; बदलापूर पालिकेचा ४४१ कोटींचा अर्थसंकल्प सादर

बदलापूर : नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर सादर केलेल्या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ न करता नागरिकांना दिलासा देतानाच पालिकेने उत्पन्नाचे स्रोत वाढवण्यावर भर दिला आहे. बुधवारी ४४१ कोटींचा अर्थसंकल्प सादर करताना तीन कोटी २६ लाखांची शिल्लक दाखवली आहे. तसेच शहर सुरक्षेवरही विशेष भर देण्यात आला आहे.कुळगाव-बदलापूर नगर परिषदेचा अर्थसंकल्प पालिकेच्या सभागृहात सादर केला. नगराध्यक्ष अ‍ॅड. प्रियेश जाधव यांच्याकडे मुख्याधिकारी प्रकाश बोरसे यांनी हा अर्थसंकल्प सादर करून त्यावर चर्चा केली. पालिकेच्या सभागृहात या अर्थसंकल्पावर चर्चा रंगली. यंदाच्या अर्थसंकल्पात गेल्या अर्थसंकल्पातील तरतुदींचाच नव्याने विस्तार करण्यात आला आहे. आगरी भवन आणि ‘सेफ सिटी’ हे दोन मुद्दे वगळले तर जुन्याच प्रकल्पांवर नव्याने खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. ४४१ कोटींच्या या अर्थसंकल्पात ४३८ कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. या अर्थसंकल्पात पुन्हा बाळासाहेब ठाकरे स्मारक, क्रीडासंकुल, अपंग पुनर्वसन, प्रशासकीय इमारतीचे आश्वासन देण्यात आले आहे. तर सेफसिटी आणि आगरी भवन यासाठी नव्याने तरतूद केली आहे. यंदा अर्थसंकल्पात प्रशासकीय इमारतीसाठी २५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर शहरातील महत्त्वाचे रस्ते आणि चौक सुरिक्षत करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी चार कोटी रुपयांची तरतूद करत सेफ सिटीचे आश्वासन नागरिकांना देण्यात आले आहे. आगरी समाजाला खूश करण्यासाठी आगरी भवनाचे आश्वासनही या अर्थसंकल्पात देण्यात आले आहे. त्यासाठी पाच कोटींची तरतूद करण्यात आली आहे.प्राथमिक शिक्षणासोबत सुरू केलेल्या माध्यमिक शिक्षणासाठीही दीड कोटींची तरतूद केली आहे. बालकल्याण, घनकचरा व्यवस्थापन, पालिकेच्या मालमत्ता सुरक्षित करणे, साथीच्या रोगांवर नियंत्रण मिळवणे आणि प्रधानमंत्री आवास योजनेसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. शहरातील रखडलेल्या प्रकल्पांनाही गती देण्यावर या बैठकीत चर्चा झाली.‘घनकचरा’साठी २० कोटींचा खर्चक्र ीडा संकुलासाठी पाच कोटी, रात्रनिवारासाठी तीन कोटी, तलाव सुशोभिकरणासाठी पाच कोटी, रस्ते विकासासाठी ३० कोटी, दलितवस्ती सुधारणासाठी पाच कोटी, भुयारी गटार योजनेसाठी १४ कोटी आणि घनकचरा व्यवस्थापनेसाठी २० कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. तसेच शहरातील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणावर सर्वाधिक भर दिले जाणार आहे.