CoronaVirus News: ‘त्या’ नर्सच्या संपर्कात आलेले अकरा कुटुंबीय कोरोनाबाधित
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2020 23:23 IST2020-06-16T23:22:32+5:302020-06-16T23:23:16+5:30
नर्सच्या संपर्कात आलेल्या तिच्या कुटुंबातील ११ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

CoronaVirus News: ‘त्या’ नर्सच्या संपर्कात आलेले अकरा कुटुंबीय कोरोनाबाधित
बोर्डी : या तालुक्यातील नरपड गावच्या मांगेलआळीत एक पोलीस आणि नर्स यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यापैकी नर्सच्या संपर्कात आलेल्या तिच्या कुटुंबातील ११ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने डहाणूतील एकूण रुग्णसंख्या ५६ झाली आहे. दरम्यान, नियमांचे काटेकोर पालन न केल्याने येथे आणखी रुग्णसंख्या वाढीची भीती व्यक्त केली जात आहे.
ही नर्स वसई तालुक्याच्या एका दवाखान्यातील कर्मचारी असून ती दवाखाना ते घर असा दैनंदिन प्रवास करायची. तिने स्वॅबसाठी नमुना दिल्यानंतर तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येईपर्यंत नरपड येथील घरात राहिली. त्यानंतर तिला उपचारासाठी हलविण्यात आले. तिच्या संपर्कात आलेल्यांचे नमुने घेऊन तपासणीकरिता देण्यात आले होते. सोमवारी त्यापैकी ११ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे स्थानिक प्रशासन खडबडून जागे झाले असून नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.