घरावर वीज पडून तिघे गंभीर, गरोदर महिला रुग्णालयात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2019 17:06 IST2019-07-22T17:05:29+5:302019-07-22T17:06:42+5:30
रविवारी रात्री तीन वाजण्याच्या सुमारास पावसासह मोठ्या प्रमाणात विजांचा कडकडाट सुरू असताना

घरावर वीज पडून तिघे गंभीर, गरोदर महिला रुग्णालयात दाखल
शशिकांत ठाकूर
कासा - डहाणू तालुक्यातील धरमपूर येथे रविवारी रात्री वीड पडून एकाच कुटुंबातील तिघे गंभीर जखमी झाले आहेत. रविवारी रात्रीच्या सुमारास ही दुर्घटना घडली. त्यानंतर, लगेचच जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रविवारी रात्री तीन वाजण्याच्या सुमारास पावसासह मोठ्या प्रमाणात विजांचा कडकडाट सुरू असताना कासाजवळील धरमपूर येथील रामा झिरवा यांच्या घरावर वीज कडाडली. त्यावेळी झोपेत असलेले कुटुंबातील तिन्ही सदस्य जखमी झाले आहेत. मायश्री रामा झिरवा (वय 20), श्रीनाथ रामा झिरवा (वय22) आणि श्रेया श्रीनाथ झिरवा( वय21) अशी जखमींची नावे आहेत. वीज पडून जखमी झालेल्यांना कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी एक महिला गरोदर आहे तर दुसऱ्या मुलीस कानाला धक्का लागल्याने ऐकायला येत नाही.