शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

सोसायटीच्या बाजूला आढळली वीजदेयके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 00:22 IST

डोंबिवलीतील घटना; संबंधितांविरोधात कारवाईची मागणी

कल्याण : डोंबिवली पूर्वेतील सुदर्शननगरमधील साईसृष्टी सोसायटीजवळ वीजदेयके फेकून दिल्याचे उघडकीस आले आहे. वीजदेयकांचे वितरण करणाऱ्या कंत्राटदाराने हा शॉर्टकट अवलंबिला असला, तरी महावितरणचा कंत्राटदारावर कोणताही वचक नसल्याने त्याचा भुर्दंड वीजग्राहकांना सोसावा लागणार आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात २४ मार्चला लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर महावितरणकडून वीजदेयके वाटली जात नव्हती. त्यामुळे ग्राहकांना मे, जून आणि जुलै या तीन महिन्यांची सरासरी देयके आली. मात्र, ही देयके जादा रकमेची असल्याने ग्राहक हवालदिल झाले. त्यानंतर, आता वीजदेयकांचे वाटप सुरू झाले आहे. मात्र, अचानक वीजदेयकांचा गठ्ठाच सोसायटीच्या बाजूला आढळून आला. हा गठ्ठा टाकणाºयाविरोधात महावितरण कारवाई करणार का, असा सवाल वीजग्राहकांनी उपस्थित केला आहे.दरम्यान, वीजदेयक भरण्याची अंतिम मुदत ९ आॅगस्ट आहे. मात्र, देयके न मिळालेल्या ग्राहकांना आता दंड भरावा लागणार आहे. महावितरणने वीजबिले वाटण्यासाठी नेमलेल्यांकडून असे प्रकार होत असतील, तर हे काम पुन्हा महावितरणनेच करावे, अशी मागणी होत आहे. महावितरणच्या कारभारावर संताप व्यक्त होत आहे.महावितरणने काही ग्राहकांना आॅनलाइनद्वारे बिले पाठविल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, ही वीजबिले अनेकांना पाहता येत नाहीत. अनेकदा वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे घरातील वायफाय, नेट कनेक्शन वीज नसल्यावर बंद असते. त्यामुळे आॅनलाइन बिल पाहणार कसे, असा प्रश्न काही नागरिकांनी विचारला आहे.

टॅग्स :electricityवीज