शहरं
Join us  
Trending Stories
1
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
2
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
5
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
6
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
7
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
8
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
9
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
10
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
11
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
12
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
13
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
14
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
15
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
16
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
17
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
18
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
19
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
20
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त

कोरोनाच्या काळात प्रशासनाचे एकदिलाने काम- एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2020 01:03 IST

कोरोनाविरुद्धचा हा लढा आपल्या संयमाची आणि जिद्दीची परीक्षा पाहणारा आहे. तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो, असेही ते म्हणाले.

ठाणे : कोरोनाच्या या संकटात आपण सर्वजण एकदिलाने एकत्र काम करीत आहोत. पुढील काळात प्रत्येकाने सुरक्षित सामाजिक अंतर राखणे, मास्कचा वापर, वारंवार हात धुणे, सॅनिटायझरचा वापर, ही चतु:सूत्री दैनंदिन जीवनात अंगीकारली, तर आपण कोरोनावर मात करू शकतो, असा विश्वास नगरविकासमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. कोरोनाविरुद्धचा हा लढा आपल्या संयमाची आणि जिद्दीची परीक्षा पाहणारा आहे. तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो, असेही ते म्हणाले.भारतीय स्वातंत्र्याचा ७३ वा वर्धापन दिन समारंभ शनिवारी ठाणे जिल्हाधिकारी प्रांगणात पार पडला. त्या प्रसंगी शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले, त्यावेळी ते बोलत होते. या समारंभास खासदार राजन विचारे, श्रीकांत शिंदे, आमदार संजय केळकर, रवींद्र फाटक, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, उपाध्यक्ष सुभाष पवार, ठाणे मनपा आयुक्त बिपिन शर्मा, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड, अतिरिक्त जिल्हाधिकारी वैदेही रानडे, निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील आदींची उपस्थिती होती.शिंदे म्हणाले की, आपण कोरोनाशी सगळे बळ, सर्व साधनसामग्री एकवटून लढतोय आणि मुख्य म्हणजे त्यात यशस्वी होतोय. मुंबई, ठाणे तसेचएमएमआर शहरांमधील गेल्या काही दिवसांमधली रुग्णांची आकडेवारी दिलासादायक आहे.नव्या रु ग्णसंख्येचा आलेख सातत्याने खाली येतोय. त्याचवेळी रु ग्ण बरे होण्याचा दर, रु ग्णसंख्या दुपटीचा कालावधी सातत्याने वाढतोय. मृत्युदर कमी करण्यात आपण यश मिळवतोय. जिल्हा प्रशासन, स्वयंसेवी संस्था, महापालिका प्रशासन यांच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.ठाणे महापालिकेच्या क्षेत्रात ग्लोबल हॉस्पिटल, त्यापाठोपाठ नवी मुंबईत वाशी येथे सिडको एग्झिबिशन सेंटरमध्ये सिडकोच्या माध्यमातून एक हजार २०० बेड्सचे रु ग्णालय उभे राहिले. कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, मीरा रोड, भार्इंदर, भिवंडी अशा सर्वच शहरांमध्ये तसेच ग्रामीण भागांत कुठे २००, तर कुठे ७०० बेड्स अशा क्षमतेची रु ग्णालये उभारण्यात आली, असे त्यांनीनमूद केले.सर्व जातीधर्मांच्या बांधवांनी यंदा अतिशय साधेपणाने सण, उत्सव साजरे करून शासनाला सहकार्य केले. आगामी गणेशोत्सव, नवरात्रोत्सव तसेच अन्य सण शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून साजरे करावेत, असे आवाहन शिंदे यांनी केले.ध्वजारोहणानंतर शिंदे यांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, कोरोनायोद्धे, विद्यार्थी, नागरिक यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते.>आपत्ती प्रतिसाद निधीतून ८६ कोटी मिळाले!जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा बळकटीकरणासाठी यंदा जिल्हा वार्षिक निधीतून आतापर्यंत २२ कोटी रु पये जिल्हा सामान्यरु ग्णालय तसेच महापालिकांना देण्यात आले आहे. तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून ८६ कोटी रु पये जिल्ह्यास उपलब्ध झाल्याचे शिंदे यांनी सांगितले.सर्व आमदार, खासदार व लोकप्रतिनिधींनी निधीतून सुमारे साडेसात कोटी रुपये जिल्हा प्रशासनाला कोरोनासाठी उपलब्ध करून दिले. या निधीतून आरोग्य सुविधा बळकट करण्यात येत आहे. एक कोटी ९६ लाख गरजंूना अन्नपाकीटवाटप करण्यासाठी हजारो हात पुढे आले. परराज्यांतील मजुरांना त्यांच्या गावी सुखरूप पोहोचवण्याचे शिवधनुष्य जिल्हा व पोलीस प्रशासनाने अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने पेलले. ठाणे जिल्ह्यातून विविध राज्यांसाठी ८० रेल्वेगाड्या रवाना झाल्या. तसेच जिल्ह्यातून पाच हजार ७०० बसगाड्यांद्वारे श्रमिकांना त्यांच्या गावी सोडण्यात आले.