शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Thane Mayor: ठाण्यात ५ वर्षात होणार ४ महापौर; सव्वा वर्षाचा फॉर्म्युला निश्चित, पहिला मान कुणाला मिळाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 13:52 IST

Thane New Mayor: महापौर आणि उपमहापौरपदाचा फार्मूला निश्चित झाला असून पहिले सव्वा वर्ष महापौरपदी शर्मिला पिंपळोलकर आणि त्यानंतर सव्वा वर्षांनी शिंदेसेनेकडून दुसऱ्या चेहऱ्याला महापौर पदाची संधी मिळेल.

अजित मांडके 

ठाणे - ठाणे महापालिकेच्या महापौरपदी शिंदेसेनेच्या कोपरी मधील नगरसेविका शर्मिला पिंपळोलकर-गायकवाड यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. तर दोन वर्षासाठी महापौर पद मिळावे अन्यथा विरोधात बसण्याची भूमिका घेणाऱ्या भाजपाने आपली भूमिका बदलत सत्तेत राहणे पसंत करत उपमहापौर पदी अर्ज दाखल केला आहे. भाजपाकडून कृष्णा पाटील यांनी नामनिर्देशन दाखल केले. विरोधात कोणीही अर्ज दाखल केले नसल्याने महापौर आणि उपमहापौर या दोघांचीही बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. मात्र त्याची अधिकृत घोषणा येत्या ३ फेब्रुवारी रोजी होणार आहे. 

महापौर पदासाठी शिंदेसेनेतून ७ नगरसेवकांची नावे पुढे आली होती. यात विमल भोईर, पद्मा भगत, दीपक जाधव, गणेश कांबळे, आरती गायकवाड, वनिता घोगरे, आणि दर्शना जानकर यांची नावे आघाडीवर होती. मात्र अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा कोपरीवर विश्वास टाकत येथील सलग दोन वेळा निवडून आलेल्या शर्मिला पिंपळोलकर-गायकवाड यांच्यावर विश्वास टाकत त्यांना महापौर पदाची संधी दिली आहे. त्या कोपरी येथील प्रभाग क्रमांक २० मधून सलग दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. 

दुसरीकडे महापौर पदावर दावा करणाऱ्या भाजपाने अखेर उपमहापौर पदावर समाधान मानले आहे. त्यानुसार शुक्रवारी प्रभाग क्रमांक ११ मधून सलग तिसऱ्यांदा निवडून आलेले कृष्णा पाटील यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केला.  विरोधी गटाकडून कोणीही नामनिर्देशन पत्र दाखल न केल्याने महापौर आणि उपमहापौर पदाची निवड बिनविरोध निश्चित झाली आहे. त्यानुसार येत्या ३ फेब्रुवारी रोजी अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

सव्वा वर्ष असणार महापौर आणि उपमहापौर पद 

महापौर आणि उपमहापौरपदाचा फार्मूला निश्चित झाला असून पहिले सव्वा वर्ष महापौरपदी शर्मिला पिंपळोलकर आणि त्यानंतर सव्वा वर्षाने शिंदेसेनेचा महापौर विराजमान होणार आहे.  तसेच भाजपाकडून देखील उपमहापौर पद हे सव्वा वर्षासाठी असणार आहे. त्यानंतर पुन्हा सव्वा वर्षाने उपमहापौर पद ही बदलले जाणार आहे. त्या ठिकाणी दुसरा चेहरा दिला जाणार आहे. असा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे.  महापौर पद शिंदेसेनेकडेच आणि उपमहापौर पद हे भाजपकडेच राहणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Shinde's Sharmila Pimpleolkar Elected Thane Mayor, BJP's Krishna Patil Deputy

Web Summary : Sharmila Pimpleolkar of Shinde's Shiv Sena became Thane's mayor unopposed. BJP's Krishna Patil is the deputy mayor. The official announcement will be on February 3rd. The mayoral and deputy mayoral terms are for one and a quarter years each, based on an agreed formula.
टॅग्स :Thane Municipal Corporation Electionठाणे महापालिका निवडणूक निकाल २०२६Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाMayorमहापौरthaneठाणे