शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
5
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
6
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
7
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
8
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
9
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
10
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
11
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
12
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
13
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
14
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
15
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
16
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
17
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
18
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
19
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
20
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी

जागा विकसित करण्याच्या नावाखाली गुंतवणूकदारांची आठ कोटींची फसवणूक

By जितेंद्र कालेकर | Published: September 22, 2020 11:50 PM

जागा विकसित करुन सदनिका देण्याच्या नावाखाली मुंबई ठाण्यातील गुुंतवणूकदारांची सुमारे आठ कोटींची फसवणूक करणाऱ्या सचिन शेलार (४५) याला चितळसर पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. आतापर्यंत या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली असून आरोपींची ११ कोटींची मालमत्ताही जप्त केली आहे.

ठळक मुद्देएकास अटकआतापर्यंत तिघांना झाली अटकआरोपींची ११ कोटींची मालमत्ताही जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: मुंंबईच्या घाटकोपर येथील जागा विकसित करुन सदनिका देण्याच्या नावाखाली मुंबई ठाण्यातील गुुंतवणूकदारांची सुमारे आठ कोटींची फसवणूक करणाऱ्या सचिन शेलार (४५) याला चितळसर पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. त्याला २८ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.ठाण्यातील ‘ओरियन बिझनेस पार्क’ येथे अमित लखनपाल याचे बांधकाम विकासाचे कार्यालय होते. मुंबईतील घाटकोपर पूर्व येथील सहयाद्रीनगर भागात जागा असून ती विकसित केली जाणार आहे. याठिकाणी एआए प्रकल्पही मंजूर आहे. तिथे कमी किंमतीमध्ये सदनिकांची विक्री केली जाणार असल्याची जाहिरात नाकपाल आणि त्याच्या भागिदारांनी एका वर्तमानपत्राद्वारे केली होती. या जागेवर एसआरए प्रकल्पही राबविला जात असल्याचीही बतावणी करण्यात आली होती. याच जाहिरातीच्या आधारे मुंबई ठाण्यातील अनेकांनी सदनिकेसाठी गुंतवणूक केली. सुरुवातीची बुकींग रक्कम भरल्यानंतर दोन वर्षांत सदनिकेचा ताबा दिला जाईल, असे भासविण्यात आले. त्यामुळे कोणाकडून ५० लाख, काहींकडून एक कोटी तर कोणाकडून दीड कोटींच्याही रकमा घेण्यात आल्या. अशा सुमारे ७० गुंतवणूकदारांची फसवणूक झाली. कहर म्हणजे यातील काही गुंतवणूकदारांना तर अलॉटमेंट लेटरही देण्यात आले. प्रत्यक्षात कोणालाही सदनिका किंवा पैसेही देण्यात आले नाही. यासंदर्भात चितळसर पोलीस ठाण्यात डिसेंबर २०१८ मध्ये तक्रार दाखल झाली होती. २०१५ ते २०१७ या कालावधीत अनेक गुंतवणूकदारांचे पैसे घेण्यात आले होते. या तक्रारीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड आणि पोलीस निरीक्षक भिलारे यांच्या पथकाने राजेश थापर (४५) आणि तुषार जोशी (३७) या दोघांना मार्च २०२० मध्ये अटक केली होती. त्यांची सध्या अंतरिम जामीनावर कोविडमुळे ठाणे न्यायालयाने सुटका केली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी सचिन शेलार (४५) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने बिटकॉईन प्रकरणात अटक केली होती. तो न्यायालयीन कोठडीत होता. त्याचाही सहभाग या प्रकरणात असल्याची माहिती पुढे आल्यामुळे ठाणे न्यायालयामार्फतीने तळोजा कारागृतून सहायक पोलीस आयुक्त पंकज शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली २१ सप्टेबर रोजी शेलार यालाही चितळसर पोलिसांनी अटक केली आहे. आतापर्यंत या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली असून आरोपींची ११ कोटींची मालमत्ताही जप्त केली आहे. उर्वरित दोन आरोपींचाही शोध घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी