शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
3
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
4
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
5
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
6
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
7
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
8
आयोग नव्हे, मतदारच राजा !
9
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
10
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
11
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
12
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
13
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
14
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
15
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
16
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
17
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
18
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
19
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
20
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई

ठाण्यातील नीरव मोदींशी संबंधीत सात कोटींच्या मालमत्तेवर ‘ईडी’ची टाच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 19:51 IST

पंजाब नॅशनल बँकेतील हजारो कोटींच्या घोटाळयाशी संबंधित ठाण्यातील ‘जिली’ या हि-याच्या दागिन्यांच्या दुकानासह ‘शॉपर्स स्टॉप’ शोरुममधील ‘जिली’ च्या काऊंटरवर छापे मारून ते ईडीच्या पथकांनी सिलबंद केले.

ठळक मुद्देअंमलबजावणी संचालनालयासह पीएनबी बँकेच्या अधिका-यांचे धाडसत्रगुरुवारी रात्री पाच तास सुरु होती कारवाईलवकरच होणार मालमत्तेचे मुल्यांकन

ठाणे : पंजाब नॅशनल बँकेत ११ हजार ४०० कोटींचा आर्थिक घोटाळा घडविल्याचा आरोप असलेल्या नीरव मोदींशी संबंधित ठाण्यातील एका मॉलमधील सात कोटींच्या मालमत्तेवर अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिका-यांनी गुरुवारी रात्री कारवाई केली. यात ‘जिली’ या हि-याच्या दागिन्यांच्या दुकानासह ‘शॉपर्स स्टॉप’ शोरुममधील ‘जिली’ च्या काऊंटरवर छापे मारून ते रात्री उशिरा सिलबंद केले.अमलबजावणी संचालनालयाच्या मुंबई विभागाचे सहायक संचालक अंजन चंदा यांच्यासह आठ जणांच्या पथकाने तसेच पंजाब नॅशनल बँकेच्या अधिका-यांनी गुरुवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास आधी विवियाना मॉलच्या तळमजल्यावरील ‘जिली’ या हि-याच्या दागिन्यांच्या ‘शॉपर्स स्टॉप’ मधील शोरुमच्या काऊंटरचा ताबा घेतला. या काऊंटरवरच काही प्रतिष्ठीत पंचांना पाचारण करून त्यांनी तिथे असलेल्या कर्मचा-यांकडून कागदपत्रांची आणि दागिन्यांची तपासणी सुरू केली. ती सुरू असतांनाच चंदा यांच्या दुस-या एका चार जणांच्या पथकाने ८.३० वाजण्याच्या सुमारास ‘जिली’ च्या मुख्य दुकानावरही धाड टाकली. अचानक सुरू झालेल्या या धाडसत्रामुळे सुरुवातीला या दुकानातील कर्मचारी पूर्णपणे गोंधळले होते. मालक नसल्यामुळे आमच्याकडे काहीच माहिती नसल्याचा दावा त्यांनी केला. परंतु, आम्ही ‘ईडी’ डिपार्र्टंमेट आणि पंजाब नॅशनल बँकेतून आलो आहोत, आम्हाला पूर्णपणे सहकार्य करा,’ असे आवाहन ओळखपत्र दाखवून या अधिका-यांनी केल्यानंतर याठिकाणीही काही पंचाना बोलावून प्रत्येक काउंटर आणि दागिन्यांची माहिती घेऊन त्याची नोंद करण्यात आली. गुरुवारी रात्री १२.३० वाजेपर्यत ही कारवाई सुरू होती. संपूर्ण दागिने, रोकड आणि कागदपत्रांची माहिती घेतल्यानंतर या दोन्ही दुकानांना रितसर सील करण्यात आले. यापुढे ही दुकाने पुढील कारवाई होईपर्यत उघडली जाणार नाहीत, असेही या अधिका-यांनी दोन्ही दुकानांतील कर्मचा-यांना बजावले. ‘गिली’ मध्ये चार कोटींची तर ‘शॉपर्स स्टॉप’ शोरुममधील ‘गिली’ च्या काऊंटरमध्ये तीन कोटींची मालमत्ता असल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, आता केवळ ही दुकाने सीलबंद करण्याची कारवाई झाली असून येत्या तीन ते चार दिवसांमध्ये दोन्ही दुकानातील ऐवजाच्या मुल्यांकनाचे काम केले जाणार असल्याची माहिती ईडीच्या अधिका-यांनी ‘लोकमत’ला दिली.

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हाEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय