शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

डोंबिवलीतील विद्यार्थ्यांनी तयार केले इकोफ्रेंडली डिटर्जंट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 11:43 PM

रिठा-शिकेकाईचा वापर; बाल विज्ञान परिषदेत दाखवली चमक

- जान्हवी मोर्ये डोंबिवली : नॅशनल चिल्ड्रन सायन्स काँग्रेस या सरकारच्या उपक्रमांतर्गत घेण्यात येणाऱ्या बालविज्ञान परिषदेत स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर शाळेतील नंदन कार्ले व ओंकार ठाकूर यांनी इकोफ्रेंडली डिटर्जंट बनवले आहे. त्यांच्या या प्रकल्पाने पूर्व राज्य पातळीपर्यंत मजल मारली आहे.राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेकरिता ‘स्वच्छ, हरित आणि आरोग्यसंपन्न देशासाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्ण कल्पना’ हा विषय प्रकल्प सादर करण्यासाठी दिला होता. त्यात पारंपारिक ज्ञानव्यवस्था हा उपविषय निवडून नंदन आणि ओंकार यांनी इकोफे्रं डली डिटर्जंट तयार केला आहे.यंदाची ही २७ वी राष्ट्रीय बालविज्ञान परिषद आहे. विद्यार्थ्यांनी संशोधन करावे या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात येते. इकोफें्रडली डिटर्जंट हा प्रकल्प आता पूर्व राज्यपातळीवर निवडला गेला आहे. राज्य पातळीवरील निवडीसाठी या प्रकल्पाची प्रथम फाइल पाठवण्यात येणार आहे. फाइलची निवड झाल्यास त्या प्रकल्पाला राज्यपातळीवर जाण्याची संधी मिळेल. राज्यपातळीची स्पर्धा पुण्यात ६ व ७ डिसेंबरदरम्यान होणार आहे. ही फाइल जिज्ञासा ट्रस्टमार्फत पुढे जाईल.नंदन आणि ओंकार हे दोघे इयत्ता आठवीत आहेत. त्यांनी तयार केलेला हे डिटर्जंट केमिकलमुक्त असून हर्बल आहे. तसेच हा डिटर्जंट आॅल इन वन क्लिनर असणार आहे. हा डिटर्जंट कपडे धुणे, भांडी घासणे, फरशी पुसणे आणि बेसिन धुण्याकरिता वापरता येऊ शकतो. सिथेंटिक डिटर्जंटने जलप्रदूषण होते. या समस्येवर हा डिटर्जंट एक चांगला पर्याय आहे. या प्रकल्पाच्या जागृतीसाठी नंदन यांनी एक पोवडा व पथनाट्य तयार केले आहे. स्वामी विवेकानंद शाळा आणि ट्युलिप सोसायटी यांनी नाटकाद्वारे या डिटर्जंटची जागृती केली आहे. या डिटर्जंटची सॅम्पल लोकांना वापरायला दिली आहेत. २३ नोव्हेंबरला पुसाळकर उद्यान येथे जागृती करण्यात येणार आहे. या डिटर्जंटने कपडे खराब होत नाही ना? कपड्यावरील डाग जातात का? कपडयाचा रंग नीट राहतो ना? या सगळ््याची पडताळणी करण्यात आली आहे. तसेच प्रदूषण विरहित हे डिटर्जंट आहे का हे पाहण्यासाठी पेंढरकर महाविद्यालयात ते टेस्टींगसाठी दिले आहे. त्याचा रिपोर्ट बुधवारपर्यंत मिळणार आहे. जास्तीत जास्त लोकांनी या इकोफ्रें डली डिटर्जंटकडे वळण्याची गरज आहे असल्याचे नंदन यांनी सांगितले.या डिटर्जंटमध्ये बाजारात सहज उपलब्ध होणाºया रिठा व शिकेकाई यासारख्या गोष्टींचा वापर केला आहे. या डिटर्जंटचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर केल्यास ते कमी किंमतीत नागरिकांना उपलब्ध होऊ शकते. या प्रकल्पाची टॅगलाईन ‘वापरा इकोफे्रं डली डिटर्जंट, जलप्रदूषण थांबवयाचे अर्जंट’ अशी आहे. एप्रिलपासून सतत वृत्तपत्रात उल्हासनदीच्या प्रदूषणाची बातमी येत होती. एका लेखामध्ये डिटर्जंटमध्ये केमिकल असल्याने त्यांचा खतासारखा वापर होतो. डिटर्जंटमधील केमिकल कमी केले पाहिजे, असे लिहिले होते. त्यावरून हे डिटर्जंट बनवण्याची कल्पना सुचल्याचे नंदन यांनी सांगितले. त्याचा हा प्रकल्पातील पहिलाच सहभाग आहे. या प्रकल्पासाठी शाळेच्या विज्ञान शिक्षिका जयश्री दौंड व मुख्याध्यापिका ज्योती नारखेडे यांचे सहकार्य त्यांना लाभले आहे.