शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

कल्याणमधील ढाब्यांवर उत्पादन शुल्क विभागाची धाड, दहा ढाब्यांवर केली कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2017 5:19 PM

कल्याण परिसरातील ढाब्यांवर अवैद्य मद्य विक्री होत असल्याप्रकरणी कल्याण उत्पादन शुल्क विभागाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने काल विविध ढाब्यांवर धाड टाकली.

कल्याण- कल्याण परिसरातील ढाब्यांवर अवैद्य मद्य विक्री होत असल्याप्रकरणी कल्याण उत्पादन शुल्क विभागाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने काल विविध ढाब्यांवर धाड टाकली. दहा ढाब्यांवर रात्रीत धाड टाकून केलेल्या कारवाईत विदेशी मद्य व दोन आरोपींना अटक केली आहे. कल्याण उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस निरीक्षक अशोक देसले यांनी माहिती दिली की, एप्रिल महिन्यापासून आजपर्यंत उत्पादन शुल्क विभागाने एकूण 49 ढाब्यांवर कारवाई केली आहे. अवैद्य मद्य विक्री करताना या ठिकाणी मद्य जप्त करण्याची कारवाई केली आहे. काल रात्री पुन्हा 10 ढाब्यांवर कारवाई केली. संजना, जय मल्हार, सिया गार्डन, हॉ शिकारा, दाजीबा, एकविरा, साई आंगन, साई उद्यान, फेण्डस्, चायनिज सेंटर या ढाब्यावर कारवाई केली आहे. त्या ठिकाणी दोन वारस मिळून आले आहेत. त्यांच्याकडून साडेपाच लिटर विदेशी मद्य जप्त करण्यात आले आहे. त्याची किंमत 4 हजार 210 रुपये इतकी आहे.उत्पादन शुल्क विभागाने कालच्या कारवाई आधी 11 नोव्हेंबरच्या रात्री देखील अशा प्रकारची धाड टाकून मिनाक्षी चायनिज, कोळीवाडा, एमएच डिरो फाईव्ह आणि एकविरा या चार ढाब्यावर कारवाई केली होती. त्याठिकाणी चार जणांच्या विरोधात अवैध मद्य विक्री प्रकरणी केसेस दाखल केलेल्या आहेत. साडेसहा लिटर विदेशी मद्य कारवाई दरम्यान जप्त केलेले आहे. त्याची किंमत 6 हाजर 733 रुपये इतकी आहे. कल्याण उत्पादन शुल्क विभागाच्या अंतर्गत कल्याण शहर, पश्चिम भाग, कोनगाव, मुरबाड, शहापूर हा विभाग येतो. ढाब्यावरील अवैध मद्य विक्रीच्या विरोधात ही कारवाई अशाच प्रकारे सुरूच राहणार असल्याचे देसले यांनी सांगितले. कल्याण-भिवंडी, कल्याण मुरबाड, कल्याण शहापूर मार्गावरील तसेच कल्याण शीळ मार्गावर असंख्य ढाबे थाटले गेलेले आहे. एकूण ढाबे किती असतील त्याची काही संख्या उत्पादन शुल्क विभागाकडे नसली तरी अवैद्य मद्य विक्रीच्या विरोधात उत्पादन शुल्क विभागाने त्यांची कारवाई तीव्र स्वरूपात सुरू केलेली आहे. रात्रीच्या वेळी या ढाब्यावर मद्य प्राशनाचा कार्यक्रम सुरू होतो. अनेक ढाबे अवैद्य मद्यविक्री करतात. हे ढाबे पहाटे दोन ते तीन वाजेपर्यंत सुरू असतात. त्यामुळे या मार्गावर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होत असल्याने उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाई पश्चात ढाबेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.

टॅग्स :kalyanकल्याण