शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
4
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
5
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
6
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
7
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
8
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
9
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
10
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
11
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
12
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
13
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
14
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
15
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
16
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
17
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
18
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
19
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
20
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी

मुंब्य्रातील अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंजमुळे केंद्राचा ३९ कोटींचा महसूल बुडाला

By जितेंद्र कालेकर | Published: August 19, 2018 11:30 PM

अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंजमुळे केंद्र शासनाचा तब्बल ३९ कोटींचा महसूल बुडाल्याची बाब समोर आली आहे. मुंब्य्राचे हे एक्स्चेंज चालविण्यासाठी दुबईतून आयपी अ‍ॅड्रेस आणि पासवर्ड दिल्यानंतरच ते कार्यान्वित होत होते.

ठळक मुद्देआरोपींच्या कोठडीत वाढ‘खाचा’ सीमकार्डची १२०० रुपयांमध्ये विक्रीपासवर्ड मिळायचा दुबईतून

जितेंद्र कालेकरलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मुंब्य्रातील अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंजमुळे केंद्र शासनाचा तब्बल ३९ कोटींचा महसूल बुडाल्याची बाब केंद्रीय दूरसंचार विभागाच्या तपासणीत समोर आली आहे. यामध्ये अटक केलेल्या शेहजाद शेख याच्यासह तिघांच्याही पोलीस कोठडीत ठाणे न्यायालयाने २२ आॅगस्टपर्यंत वाढ केल्याची माहिती सूत्रांनी दिली.मुंब्य्रातील कौसा भागातील ‘कादर पॅलेस’मधील वेगवेगळ्या इमारतीमधील शेहजाद शेख, शकील शेख आणि मोहंमद खान या तिघांना १३ आॅगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पासलकर, अरुण क्षीरसागर, सहायक पोलीस निरीक्षक हणमंत क्षीरसागर आणि उपनिरीक्षक अजित बडे आदींच्या पथकाने अटक केली. त्यांचा चौथा साथीदार वसीलउल्ला शेख हा अजूनही पसार आहे. या टोळीने निवासी इमारतीमधूनच अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंज सुरू केले होते. त्यांच्याकडील ‘खाचा’ सीमकार्ड कार्यान्वित झाल्यापासून ते या टेलिफोन केंद्रावर धाड पडेपर्यंत दूरसंचार निगम विभागाचा किती महसूल बुडाला, याची चाचपणी केंद्रीय अधिकाऱ्यांनी मुंब्य्रातील या एक्स्चेंजमधून मिळालेल्या सामग्रीच्या आधारे केली. त्यावेळी ३९ कोटींचा महसूल बुडाल्याची बाब समोर आली आहे. पोलिसांनी चारही आरोपींच्या घरातून १९ सीम बॉक्स मशीन, ३७ वायफाय राउटर, २९१ सीमकार्ड अशी इलेक्ट्रॉनिक सामग्री हस्तगत केली आहे. याच सामग्रीच्या आधारे हे विश्लेषण केल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाºयाने ‘लोकमत’ला दिली.......................................पासवर्ड मिळायचा दुबईतूनमुंब्य्राचे हे एक्स्चेंज चालवण्यासाठी समीर नावाची व्यक्ती दुबईतून आयपी अ‍ॅड्रेस आणि पासवर्ड द्यायची. त्यानंतरच, हे एक्स्चेंज कार्यान्वित होत होते.......................................काय असते ‘खाचा’ सीमकार्ड?बनावट आधारकार्ड आणि पॅनकार्डचा वापर करून वेगवेगळ्या मोबाइल कंपन्यांमधून काही सीमकार्ड मिळवून कार्यान्वित केले जायचे, ते ‘खाचा’ कार्ड म्हणून ओळखले जात होते. याच खाचा कार्डची विक्री हे एक्स्चेंज चालवणा-यांना १२०० रुपयांमध्ये केली जात होती. भिवंडीत पोलिसांनी अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंजवर धाड टाकल्यानंतर असे खाचा कार्ड पुरवणारे वितरक गायब झाले होते. त्यामुळेच मुंब्य्रातील हे एक्स्चेंजही काही महिने बंद होते. अलीकडेच ते सुरू झाले होते. त्याची खबर मिळाल्यानंतर ठाणे पोलिसांनी धाड टाकली. या धाडीनंतर पुन्हा हे वितरक गायब झाल्याची बाब तपासात समोर आली आहे. या खाचा सीमकार्डवरून संबंधित कार्डधारकाचा शोध घ्यायचा झाल्यास कार्डधारकाचा पत्ता किंवा कोणतीही माहिती खोटी आढळते. त्यामुळे त्याआधारे पोलिसांना कोणताच शोध घेता येत नाही. त्यामुळेच एरव्ही १०० ते १५० रुपयांमध्ये मिळणारे हे खाचा सीमकार्ड चढ्या भावाने म्हणजे अगदी १२०० ते १५०० रुपयांपर्यंतही विकले जाते, असेही या अधिकाºयाने सांगितले.........................

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हाBSNLबीएसएनएल